'उपमुख्यमंत्र्यांना ती गोष्ट खूप जड जाणार'; जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांना इशारा
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
पुणे, प्रतिनिधी : आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या या दौऱ्यामध्ये पुण्यातील मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील मराठा समाजाच्या मनात खदखद आहे. मराठा समाजाला आरक्षण देतो असं सांगून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी धोका दिला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाज आपला रोष व्यक्त करेल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. माझा राजकीय मार्ग नसल्याने मी माझ्या मराठा आरक्षणाच्या ध्येयावर ठाम आहे. मात्र हे खरं आहे या सरकारने मला खूप त्रास दिला आहे. ज्याप्रकारे उपमुख्यमंत्री यांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत, आणि आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला आहे, ते त्यांना या निवडणुकीत खूप जड जाणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.
advertisement
दरम्यान समाज हुशार आहे. मात्र माझा नाईलाज आहे. निवडणुकी सारखी कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक करायला हवी. सात महिन्यात मी एकही गृहमंत्री आणि सरकारचा डाव यशस्वी होऊ दिला नाही, त्यांचा डाव यशस्वी झाला असता तर मीच समाज एकत्र केला आणि मीच समाजाला मातीत घातलं असं झालं असतं. जर राज्यातील सरकारने आम्हाला सहा जूनपर्यंत आरक्षण नाही दिलं तर विधानसभा निवडणुकीला संपूर्ण महाराष्ट्र काबीज करणार असा इशारा देखील यावेळी मनोज जरागे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
Location :
Pune,Pune,Maharashtra
First Published :
Apr 07, 2024 2:09 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
'उपमुख्यमंत्र्यांना ती गोष्ट खूप जड जाणार'; जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांना इशारा







