Wether Update : अवकाळीनंतर राज्यावर नवं संकट, उष्णतेची येणार लाट, हवामान विभागाचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यात पावसाचे वातावरण होते. त्याचबरोबर विविध ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस सुद्धा झालाय. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आता राज्यातील तापमानात चांगलीच वाढ होताना दिसून येत आहे.
पुणे : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यात पावसाचे वातावरण होते. त्याचबरोबर विविध ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस सुद्धा झालाय. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आता राज्यातील तापमानात चांगलीच वाढ होताना दिसून येत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांतील तापमान हे 43 ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. पाहुयात 6 एप्रिलला राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल.
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांत उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. 6 एप्रिलला मुंबईतील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश राहून वातावरण दमट आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. पुढील 2 दिवसांत मुंबईतील तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
पुण्यातील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 6 एप्रिलला पुण्यात मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. त्याचबरोबर पुढील 24 तासांत पुण्यातील तापमानात वाढ होणार असल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 एप्रिलला मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. पुढील 24 तासांत तेथील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
नाशिकमधील तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. 6 एप्रिलला तेथील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं.
advertisement
नागपूरमधील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 6 एप्रिलला त्याठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण असू शकतं. नागपूरमधील तापमानात पुढील काही दिवसांत वाढ होऊन ते 41 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भातील अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातील तापमानात चांगलीच वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
राज्यातून पावसाचे वातावरण गायब होऊन आता सर्वत्र तापमानाचा पारा वाढतांना दिसून येत आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी दमट वातावरण निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. वातावरणात पुन्हा अचानक बदल होत असल्याने नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
April 05, 2025 7:45 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Wether Update : अवकाळीनंतर राज्यावर नवं संकट, उष्णतेची येणार लाट, हवामान विभागाचा अलर्ट