वृद्धाच्या अकाऊंटमध्ये आले पावणेतीन कोटी रूपये; हडपण्यासाठी मुलानेच केलं नको ते कांड
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
शेतकऱ्याच्या मावळ तालुक्यातील शेतजमिनीपैकी 38 गुंठ्यांचं भूसंपादन करण्यात आलं. त्याचा मोबदला म्हणून त्यांना पावणेतीन कोटींपर्यंत रक्कम मिळाली
पुणे : एका वृद्धाची चक्क त्याच्याच मुलाने फसवणूक केल्याची विचित्र घटना समोर आली आहे. PMRDA च्या बाह्यवळण रस्त्यासाठी संपादन केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात मिळालेले एक कोटी 82 लाख रुपये मुलाने बँक खात्यातून परस्पर वळवून घेतल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी 89 वर्षीय वृद्धाचा मुलगा, सून आणि नातवांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील ही घटना आहे.
तालुक्यातील पाचाणे येथील वृद्ध शेतकऱ्याने याप्रकरणी शुक्रवारी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) अंतर्गत बाह्यवळण रस्त्याचं मावळ तालुक्यात काम सुरू आहे. त्यासाठी या वृद्ध शेतकऱ्याच्या मावळ तालुक्यातील शेतजमिनीपैकी 38 गुंठ्यांचं भूसंपादन करण्यात आलं. त्याचा मोबदला म्हणून त्यांना पावणेतीन कोटींपर्यंत रक्कम मिळाली. शेतकरी वयोवृद्ध असल्याने ही रक्कम कोणीतरी फसवणूक करून खात्यातून वळवून घेतील, असं शेतकऱ्याच्या मुलाने, सुनेनं आणि नातवांनी सांगितलं.
advertisement
वृद्ध शेतकऱ्याच्या सह्या घेत बँकेत जॉइंट अकाऊंट काढलं. शेतकऱ्याच्या मुलाने, सुनेनं आणि नातवांनी या खात्यावरील एक कोटी 82 लाख रुपये परस्पर त्यांच्या इतर खात्यांत वळवून घेतले. काही दिवसांनी वृद्ध शेतकरी बँकेत गेले असता त्यांच्या खात्यातून एक कोटी 82 लाख रुपये वळवल्याचं समोर आलं. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. मुलाने त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत मिळून स्वतःच्या वडिलांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
वृद्ध शेतकऱ्याला दोन मुलं आणि एक मुलगी अशी तीन अपत्ये आहेत. या तिघांमध्ये शेतजमिनीची आणि इतर मिळकतीची समान वाटणी करण्याचं शेतकऱ्याने तिघांना सांगितलं होतं. मात्र, त्यापूर्वीच त्यांच्याच मुलाने त्यांची फसवणूक करत ही रक्कम आपल्या खात्यात वळवून घेतली.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 23, 2025 11:20 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
वृद्धाच्या अकाऊंटमध्ये आले पावणेतीन कोटी रूपये; हडपण्यासाठी मुलानेच केलं नको ते कांड


