दिवसरात्र काम अन् टोमणे; उपाशीही ठेवायची, सूनेकडून 80 वर्षीय सासूला 'सासूरवास', कोर्टाने दिला दणका
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सूनेच्या जाचामुळे 80 वर्षाच्या उतरत्या वयातील वृद्धेचं आयुष्य वेदनादायी बनलं आहे. सून तिला घरातील सगळी कामं करायला लावण्यापासून ते उपाशी ठेवण्यापर्यंत सर्व प्रकारचा त्रास देते.
पुणे : सासूने सुनेचा छळ केल्याच्या आणि त्रास दिल्याच्या अनेक घटना आपण आजवर ऐकल्या किंवा पाहिल्याही असतील. मात्र, आता काळ बदलला आहे आणि अनेकदा सुनेकडून सासूचा छळ झाल्याच्या घटनाही समोर येतात. अशाच एका सासूला सासूरवास करणाऱ्या सूनेचं कृत्य समोर आलं आहे. सासूने सुनेविरोधात थेट न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयानेही दोन महिन्यांच्या आत 2 लाख रूपये वृद्ध महिलेला देण्याचे आदेश दिले आहेत.
सूनेच्या जाचामुळे 80 वर्षाच्या उतरत्या वयातील वृद्धेचं आयुष्य वेदनादायी बनलं आहे. सून तिला घरातील सगळी कामं करायला लावण्यापासून ते उपाशी ठेवण्यापर्यंत सर्व प्रकारचा त्रास देते. अखेर हा त्रास सहन न झाल्याने वृद्ध महिलेनं मुलगा आणि सुनेविरोधात कौटुंबिक हिंसाचारांतर्गत न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने मुलगा आणि सुनेविरोधात निकाल दिला आणि वृद्ध महिलेला मोठा दिलासा दिला.
advertisement
कोर्टाने त्यांना वृद्ध महिलेविरुद्ध घरगुती हिंसाचाराचं कोणतंही कृत्य करण्यास मनाई केली. तसंच संयुक्तपणे किंवा वैयक्तिकरित्या घरगुती हिंसाचाराच्या कृत्यांमुळे झालेल्या दुखापतींसाठी महिलेला दोन महिन्यांच्या आत प्रत्येकी 2 लाख रूपये देण्याचे आदेशही महिलेचा मुलगा आणि सूनेला दिले.
महिलेचा मुलगा आणि सून दोघांचाही आधी घटस्फोट झालेला असून हे दोघांचंही दुसरं लग्न आहे. वृद्ध महिलेनं ते स्विकारलंही. तिघंही एकाच घरात राहू लागले. वृद्ध महिलेला ऑस्टियोपोरोसिस, पायात फ्रॅक्चर असे आजार आहेत. मात्र. तरीही ती घरातली कामं करायची. सून सासूला सतत टोमणे मारून बोलायची.
advertisement
मुलगा आणि सून दोघंही तिची काळजी घेत नव्हते. सून तिला जेवण देत नसायची, उपाशी ठेवायची. हे घर माझं आहे, तू निघून जा, असं सासूला सतत म्हणायची. अखेर या त्रासाला कंटाळून वृद्ध महिलेनं सुनेविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यानंतर वृद्ध महिलेनं अॅड. स्मिता देशमुख यांच्यामार्फत मुलगा आणि सुनेविरुद्ध कौटुंबिक हिंसाचारांतर्गत न्यायालयात दावा दाखल केला आणि त्यांना न्यायही मिळाला.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 23, 2025 10:14 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
दिवसरात्र काम अन् टोमणे; उपाशीही ठेवायची, सूनेकडून 80 वर्षीय सासूला 'सासूरवास', कोर्टाने दिला दणका


