खोलीत जाताच समोर दिसला बिबट्या अन्...; मुळशीतील फार्महाऊसच्या केअरटेकरसोबत घडली थरारक घटना
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
त्यांनी आपल्या खोलीचा दरवाजा उघडला. याचवेळी, व्हरांड्याच्या दरवाजामागे लपलेला बिबट्या अचानक समोर आलेल्या सोनवणे यांना पाहून गोंधळला
पुणे : मुळशी तालुक्यातील होतले परिसरात एका खासगी फार्महाऊसच्या केअरटेकरवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. मंगळवारी २५ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ज्यात बिबट्याच्या नखांमुळे गोविंद सोनवणे नावाचा केअरटेकर जखमी झाला आहे. या घटनेमुळे होतले परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी वनविभागाकडून तातडीने अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
घटनेची माहिती अशी आहे की, गोविंद सोनवणे हे फार्महाऊसवर आलेल्या पाहुण्यांसाठी चहा घेऊन तळमजल्यावरील आपल्या खोलीतून पहिल्या मजल्यावर जात होते. ते परतत असताना, त्यांनी आपल्या खोलीचा दरवाजा उघडला. याचवेळी, व्हरांड्याच्या दरवाजामागे लपलेला बिबट्या अचानक समोर आलेल्या सोनवणे यांना पाहून गोंधळला. दोघेही एकमेकांना अचानक समोर पाहून गडबडले.
advertisement
बिबट्याने तत्काळ सोनवणे यांच्या दोन्ही पायांमधून कसाबसा मार्ग काढला आणि वेगाने धूम ठोकली. या धावपळीत बिबट्याच्या नखांनी सोनवणे यांच्या पायाला खरचटलं. मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेनंतर घाबरलेल्या सोनवणे यांनी धावताना बिबट्याला पाहिलं. अंदाजे गुडघाभर उंचीचा हा बिबट्या असावा, असं त्यांनी सांगितलं. सोनवणे सध्या पौड येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
advertisement
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. होतले-डोंगरगाव येथील घाटमाथ्यावरील वनक्षेत्रात बिबट्याचा वावर असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. सदर घटनेतील प्राणी बिबट्याच होता की नाही, याची माहिती घेतली जात आहे. नागरिकांनी वन्यजीव आढळल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 30, 2025 11:32 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
खोलीत जाताच समोर दिसला बिबट्या अन्...; मुळशीतील फार्महाऊसच्या केअरटेकरसोबत घडली थरारक घटना


