मृतदेहालाही सोडलं नाही, छ. संभीजनगरच्या रुग्णालयात संतापजनक प्रकार, नातेवाईकांनी थेट...

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमधून एक संतापजनक प्रकार पुढे आला आहे. आयसीयुमध्ये मृतासोबत घडलेल्या प्रकाराने संताप व्यक्त होत आहे.

मृतदेहालाही सोडलं नाही, छ. संभीजनगरच्या रुग्णालयात संतापजनक प्रकार, नातेवाईकांनी थेट...
मृतदेहालाही सोडलं नाही, छ. संभीजनगरच्या रुग्णालयात संतापजनक प्रकार, नातेवाईकांनी थेट...
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही काळात छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे दागिने लंपास होण्याचे प्रकार वाढले आहेत. अशातच आणखी एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. अदालत रोडवरील एका खासगी रुग्णालयात सलग दुसऱ्यांदा असाच प्रकार घडला आहे. कन्नड तालुक्यातील 63 वर्षीय मृत महिलेच्या अंगावरील दागिने गायब झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
कन्नड तालुक्यातील बिजला मनोहर गायकवाड यांचं उपचारासाठी आल्यानंतर रुग्णालयात निधन झालं. त्यानंतर कुटुंबीय पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात गुंतले होते. तेव्हा आयसीयूमधून त्यांच्या अंगावरील अंदाजे चार तोळ्यांचे दागिने रहस्यमयरीत्या लंपास झाले. या प्रकरणी क्रांती चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
नेमकं घडलं काय?
बिजला गायकवाड यांची 13 नोव्हेंबरला सकाळी तब्येत बिघडल्यामुळे त्यांची मुलं संदीप आणि किरण यांनी त्यांना अदालत रोडवरील न्यायालयासमोर असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना त्यांच्या अंगावरचे दागिने तसेच होते. दुपारी अचानक त्यांचे निधन झाल्यानंतर मुलांनी आईला पाहिलं, तेव्हादेखील दागिने अंगावरच होते. त्यानंतर पोलिस पंचनामा सुरू झाल्यावर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह झाकण्यासाठी संपूर्ण कपडा गुंडाळून ठेवला. कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी घेऊन जात असताना दोन्ही मुलांचे लक्ष दागिन्यांकडे गेले. तेव्हा मात्र 2 तोळ्यांची सोनसाखळी आणि 2 तोळ्यांचे कर्णफुले लंपास झालेले आढळून आले.
advertisement
दागिने गायब झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तात्काळ वरिष्ठ डॉक्टरांकडे तक्रार केल्यावर डॉ. दिनेश पांडव आणि डॉ. शैलेश खरे यांनी दागिने पाहिल्याचे मान्य केले. तपासात आयसीयूमध्ये एक पेंडल मिळून ते परत देण्यात आले. रुग्णालयाचे सीईओ डॉ. प्रशांत पाटील यांनी सात दिवसांत उर्वरित दागिने मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र अनेकदा संपर्क करूनही दागिने मिळाले नाहीत. त्यामुळे ही चोरी नर्सिंग स्टाफ किंवा हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांनी केली असावी, असा संशय कुटुंबीयांनी तक्रारीत व्यक्त केला आहे.
advertisement
दरम्यान, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे अंमलदार संतोष मुदिराज हे पुढील तपास करत आहेत. मृतदेहाच्या अंगावरील दागिने चोरण्याच्या या प्रकाराने संताप व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मृतदेहालाही सोडलं नाही, छ. संभीजनगरच्या रुग्णालयात संतापजनक प्रकार, नातेवाईकांनी थेट...
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement