समलैंगिक संबंधातून 21 वर्षीय तरुणाची भररस्त्यात कोयत्याने हत्या? पुण्यातील खळबळजनक घटना

Last Updated:

बकोरी रोड वाघोली येथे एका 21 वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले होते. त्यानंतर तातडीनं जखमी तरुणाला रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र..

समलैंगिक संबंधातून हत्या (प्रतिकात्मक फोटो)
समलैंगिक संबंधातून हत्या (प्रतिकात्मक फोटो)
पुणे 29 नोव्हेंबर (वैभव सोनवणे, प्रतिनिधी) : पुण्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात बकोरी रोड वाघोली येथे एका 21 वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले होते. त्यानंतर तातडीनं जखमी तरुणाला रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र, ससून रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही हत्या समलैंगिक संबंधातून झाली असल्याचं सांगितलं जात आहे.
एका 21 वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले होते. त्यानंतर तातडीने सदर युवक हा बीजीएस कॉलेज वाघोली येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. तो वाढीबोलाही येथे एका होस्टेलमध्ये राहत होता. त्याने त्याला रूग्णालयात घेऊन जाणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीस आपल्याला मारणाऱ्या आरोपीचं नाव आणि सदरचा प्रकार सांगितलं. प्रेमप्रकरणातून हा हल्ला झाल्याचं त्याने कळवलं होतं आणि त्यानंतर तो बेशुद्ध झाला होता.
advertisement
तपासादरम्यान समोर आलेल्या बाबीनुसार सदरची हत्या ही समलैंगिक संबंधातून झाल्याचा दाट संशय आहे. परंतु नेमक्या कारणाचा पोलीस अजूनही शोध घेत आहेत. जखमी इसमाने सोबतच्या साक्षीदारास दिलेल्या तोकड्या वर्णनावरून आरोपीचं पूर्ण सविस्तर वर्णन मिळवण्यात आलं आहे. आता आरोपीच्या शोधार्थ दोन पथकं रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपी ताब्यात येण्याची शक्यता आहे.सदर प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात येत आहे.
advertisement
मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. 21 वर्षीय तरुण महाविद्यालयातून घरी निघाला होता. यावेळी ओळखीतीलच एका तरुणाने त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याला जखमी केलं. जखमी तरुणाला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रक्तस्त्रावमुळे त्याला ससून रुग्णालयात हलवण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. ससूनला घेऊन जात असताना वाटेतच जखमी तरुणाचा मृत्यू झाला.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
समलैंगिक संबंधातून 21 वर्षीय तरुणाची भररस्त्यात कोयत्याने हत्या? पुण्यातील खळबळजनक घटना
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement