NCL Pune Bharti: नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये नोकरभरती, आयटीआय तरूणांसाठी मोठी संधी; अर्जाची शेवटची तारीख आली जवळ

Last Updated:

NCL Pune Bharti: नॅशनल केमिकल लॅब्रॉटरी कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे कंपनीमध्ये ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी नोकरभरतीची घोषणा करण्यात आली आहे. पुण्याच्या एनसीएल कंपनीमध्ये ट्रेड अप्रेंटिसशिपपदासाठी 40 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

NCL Pune Bharti: नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये नोकरभरती, आयटीआय तरूणांसाठी मोठी संधी; अर्जाची शेवटची तारीख आली जवळ
NCL Pune Bharti: नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये नोकरभरती, आयटीआय तरूणांसाठी मोठी संधी; अर्जाची शेवटची तारीख आली जवळ
नॅशनल केमिकल लॅब्रॉटरी कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे कंपनीमध्ये ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी नोकरभरतीची घोषणा करण्यात आली आहे. पुण्याच्या एनसीएल कंपनीमध्ये ट्रेड अप्रेंटिसशिपपदासाठी 40 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. आयटीआय झालेल्या तरूणांसाठी ही नोकरभरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांच्या नोकरभरतीला सुरूवात 22 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेल्या नोकरभरतीचा शेवटचा दिवस 10 नोव्हेंबर 2025 पर्यंतचा आहे. ऑनलाईन पद्धतीने जरीही अर्ज प्रक्रिया असली तरीही भरती प्रक्रिया प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे.
ट्रेड अप्रेंटिसशिप पदासाठी वयोमर्यादा 24 वर्षांपर्यंतची असणार आहे. एकूण पदसंख्या 40 असणार आहे. पेंटर, कार्पेंटर, डिझेल मॅकेनिक, फिटर, टर्नर, प्लंबर, वेल्डर, वायरमन, इलेक्ट्रिशियन आणि इलेक्ट्रॉनिक मॅकेनिकसह अन्य काही पदांसाठी अप्रेंटिसशिप आहे. इच्छूक उमेदवारांनी ट्रेड अप्रेंटिसशिपच्या जाहिरातीच्या PDF वरून अधिकाधिक माहिती मिळवा. खुल्या प्रवर्गासाठी, अनुसूचित जाती- जमाती, इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग आणि शारिरीक दृष्ट्‍या दुर्बळ असलेल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 40 जागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी असलेल्या तरूणांना स्टायपेंड देखील मिळणार आहे.
advertisement
ज्या उमेदवाराने एक वर्षाचा आयटीआयचा कोर्स केला आहे, त्याला 7700 इतके मासिक वेतन मिळणार आहे. तर, ज्या उमेदवाराने दोन वर्षांचा आयटीआयचा कोर्स केला आहे, त्याला 8050 इतके मासिक वेतन मिळणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्जपद्धती असली तरीही मुलाखत पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाणार आहे. मुलाखत 10 ऑक्टोबर 2025 रोजी होणार असून कार्यशाळा (ESU), CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, डॉ. होमी भाभा रोड, पाषाण रोड, पुणे 411008 हा मुलाखतीचा पत्ता आहे. मुलाखतीला जाताना अनेक आवश्यक कागदपत्रांची गरज लागणार आहे. त्यासाठी अर्जदारांनी जाहिरातीची PDF एकदा आवश्यक वाचावी. शिवाय, उमेदवारांना मोफत पद्धतीने हा ऑनलाईन अर्ज आहे.
मराठी बातम्या/पुणे/
NCL Pune Bharti: नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये नोकरभरती, आयटीआय तरूणांसाठी मोठी संधी; अर्जाची शेवटची तारीख आली जवळ
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement