निगडीत पार्किंगची समस्या संपवण्यासाठी सुरु होणार नवा प्रकल्प; वाहनचालकांना मिळणार मोठा दिलासा
Last Updated:
Nigdi Multi-Level Parking Project : निगडीमध्ये भविष्यात वाढत्या नागरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या पार्किंग समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. ज्यात बहुमजली वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.
पुणे : नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी भविष्यात होणाऱ्या पार्किंग समस्यांवर उपाय शोधण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे गर्दी वाढत असून वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थापन गंभीर आव्हान बनत आहे. या परिस्थितीत नागरिकांना रोजच्या दैनंदिन जीवनात वाहतूक कोंडी, अव्यवस्थित पार्किंग आणि पादचाऱ्यांसाठी असुविधा यांचा सामना करावा लागत आहे. विशेषतहा रेल्वेस्टेशन परिसरात आणि भेळ चौकाजवळ पार्किंगची कमतरता मोठा प्रश्न ठरत आहे.
शहरात कुठे उभारले जाणार आहे बहुमजली वाहनतळ?
यावर उपाय म्हणून प्राधिकरणाने भेळ चौक आणि आकुर्डी रेल्वेस्टेशनजवळील महत्त्वाच्या भूखंडांवर बहुमजली वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव पीएमआरडीएकडून विकसित करण्यासाठी ताब्यात घेण्यात येईल आणि यासाठी आयुक्तांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. यामध्ये एनपीआरएफ फाउंडेशनच्या वतीने निवेदनही पालिका आयुक्तांना सादर केले गेले आहे.
advertisement
या प्रकल्पाबाबत झालेल्या बैठकीत माजी महापौर आर. एस. कुमार, सामाजिक कार्यकर्ते नीलेश शिंदे, अतुल भोंडवे, विजयकुमार नाईक, सचिन बनसोडे, अमोल भोईटे, प्रशांत साबळे, धनंजय कदम, अश्विन खरे यांसह ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या आणि बहुमजली वाहनतळ उभारल्यास त्यांना होणाऱ्या फायदेविषयी चर्चा करण्यात आली.
advertisement
शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात पार्किंगची कमतरता ही मोठी अडचण ठरत आहे. रेल्वेस्टेशन परिसरातील वाहने अव्यवस्थितपणे उभ्या केल्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होते तर पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालण्यासाठी जागा मिळत नाही. बहुमजली वाहनतळ उभारल्यास या समस्येवर कायमस्वरूपी उपाय मिळेल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये कोणती?
भेळ चौक आणि आकुर्डी रेल्वेस्टेशनजवळील महत्त्वाच्या भूखंडांवर बहुमजली वाहनतळ उभारले जाणार.
advertisement
पार्किंग समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून आयुक्तांची तत्त्वतः मान्यता.
वाहनतळ उभारल्यास शेकडो वाहनांना सुरक्षित आणि व्यवस्थित जागा मिळेल.
वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत, नागरिकांची असुविधा दूर होईल.
प्रत्यक्ष पाहणी करून लवकरच कार्यवाही सुरू होणार.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. उड्डाणपूलासह बहुमजली वाहनतळ उभारल्यास, पार्किंगची समस्या निवारण होण्यास मदत होईल, रेल्वेस्टेशन परिसरातील वाहतूक सुचारू होईल आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षितता वाढेल. तसेच, नागरिकांना वाहन ठेवण्यासाठी सुरक्षित आणि संरक्षित जागा मिळाल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सुलभ होईल.
advertisement
शहरातील नागरिक आणि प्रवासी या प्रकल्पाची खूपच अपेक्षा करत आहेत. कारण बहुमजली वाहनतळामुळे त्यांना दररोजच्या जीवनातील वाहतूक आणि पार्किंगच्या समस्यांवर स्थायी तोडगा मिळेल. प्राधिकरण आणि आयुक्तांच्या सहकार्याने हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे शहराच्या भविष्यातील वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थापन अधिक सक्षम होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 9:49 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
निगडीत पार्किंगची समस्या संपवण्यासाठी सुरु होणार नवा प्रकल्प; वाहनचालकांना मिळणार मोठा दिलासा