Share Market Prediction: कुछ बड़ा होने वाला है...; 6 ऑक्टोबर तारीख नोट करून ठेवा, बाजारात फक्त 3 दिवसांची संधी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Tata Capital IPO: टाटा कॅपिटलने 26 सप्टेंबरला सेबीकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल करत 16,400 कोटींच्या मेगा आयपीओची तयारी वेगात सुरू केली आहे. हा 2025 मधील सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता असून 6 ऑक्टोबरपासून गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे.
मुंबई: टाटा कॅपिटलने 26 सप्टेंबर रोजी सेबी आणि स्टॉक एक्स्चेंजकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) दाखल केला आहे. यामुळे टाटा समूहाच्या या एनबीएफसीने आपल्या मेगा आयपीओकडे आणखी एक पाऊल टाकले आहे. या इश्यूअंतर्गत कंपनी 21,00,00,000 (21 कोटी) नवे शेअर्स जारी करणार आहे. प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये असेल. या इश्यूमध्ये ऑफर फॉर सेल (OFS) देखील समाविष्ट असेल. ओएफएसमध्ये प्रमोटर्स 26,58,24,280 शेअर्स विकणार आहेत.
advertisement
आयपीओमध्ये गुंतवणुकीची मुदत
टाटा कॅपिटलचा आयपीओ 6 ऑक्टोबर रोजी खुला होईल आणि 8 ऑक्टोबरपर्यंत यात गुंतवणूक करता येईल. एंकर इन्व्हेस्टर्ससाठी हा इश्यू 3 ऑक्टोबर रोजी खुला होणार आहे. मनीकंट्रोलने यासंबंधीची माहिती 23 सप्टेंबरलाच दिली होती. या बातमीत इश्यूच्या ओपन आणि क्लोजिंग तारखांसोबतच संभाव्य व्हॅल्युएशनबाबतही माहिती देण्यात आली होती. टाटा समूह लिस्टिंगनंतर टाटा कॅपिटलसाठी 16.5 अब्ज डॉलर्सच्या व्हॅल्युएशनचे लक्ष्य ठेवत आहे.
advertisement

16,400 कोटी रुपयांचा होऊ शकतो आयपीओ
हा आयपीओ सुमारे 1.85 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 16,400 कोटी रुपयांचा असू शकतो. हा 2025 मधील सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो. तसेच आतापर्यंत आलेल्या टॉप 5 आयपीओंपैकी एक म्हणूनही त्याची नोंद होईल. या इश्यूमध्ये एलआयसीकडून मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. एलआयसी एंकर इन्व्हेस्टर म्हणून यात सहभाग घेऊ शकते. टाटा कॅपिटलमध्ये टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्स यांची मोठी हिस्सेदारी आहे. याशिवाय आयएफसी आणि टाटा समूहातील TMF Holdings Ltd, Tata Investment Corporation, Tata Motors, Tata Chemicals, Tata Power या कंपन्यांचीही हिस्सेदारी आहे.
advertisement
आरबीआयकडून अतिरिक्त वेळ
आरबीआयच्या नियमांनुसार टाटा कॅपिटलसारख्या मोठ्या एनबीएफसींसाठी 30 सप्टेंबरपर्यंत स्वतःला स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट करणे बंधनकारक आहे. मात्र टाटा कॅपिटलने लिस्टिंगसाठी आरबीआयकडून थोडा अधिक वेळ घेतला आहे. मनीकंट्रोलने याबाबतची पहिली बातमी 5 एप्रिल रोजी दिली होती की, टाटा कॅपिटलने सेबीकडे ड्राफ्ट पेपर्स दाखल केले आहेत. तसेच 21 मार्च रोजी मनीकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार टाटा कॅपिटलने 10 इन्व्हेस्टमेंट बँकांना सल्लागार म्हणून नियुक्त केले होते.
advertisement
शेअर बाजारातील खराब सेंटिमेंट
हा आयपीओ अशा काळात येत आहे, जेव्हा बाजारातील सेंटिमेंट खालावलेले आहे. ऑगस्टमधील नीचांकी पातळीवरून जवळपास 1000 अंकांनी चढल्यानंतर निफ्टीने आपली बहुतांश वाढ गमावली आहे. या आठवड्यात बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. 26 सप्टेंबरला आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 9:31 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Share Market Prediction: कुछ बड़ा होने वाला है...; 6 ऑक्टोबर तारीख नोट करून ठेवा, बाजारात फक्त 3 दिवसांची संधी