निलेश घायवळला मोठा दणका, अखेर पासपोर्ट रद्द; ऑर्डर जारी
- Published by:Prachi Amale
Last Updated:
निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द झाल्याने अडचणी वाढल्या आहेत.
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द करण्यात आली आहे. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून ऑर्डर जारी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळ बाबत अहवाल सादर केला होता. पासपोर्ट रद्द झाल्याने निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या आहेत.
advertisement
निलेश घायवळ याने खोटी माहिती देखील पासपोर्ट काढला अन् परदेशी फरार झाला आहे. निलेश घायवळने गंभीर गुन्ह्यांमुळे पासपोर्ट मिळणे अवघड असल्याचे लक्षात येताच बनावट कागदपत्रांचा आधार घेतला. पोलिसांनी तपास केल्यानंतर हे पुरावे पासपोर्ट ऑफिसला पाठवले होते. त्यानंतर कार्यलयाकडून कारवाई करत निलेश घायवाळचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. ऑर्डरमध्ये विविध मु्द्दे ठिकाणी लिहण्यात आले आहे.
advertisement
घायवळ कसा पळाला?
घायवळने नावात बदल करून ‘घायवळ’ऐवजी ‘गायवळ’ असे नमूद केले आणि अहिल्यानगरमधील खोटा पत्ता दाखवत 23 डिसेंबर 2019 रोजी तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला होता. घायवळने Ghaywal या नावातील h काढून Gaywal असं केलं. त्यामुळे मोठे गुन्हे दाखल असताना देखील घायवळला पासपोर्टमुळे फरार होता आलं.
पासपोर्ट पोलीसांकडे जमा करण्याचे आदेश
advertisement
पुण्यातील पासपोर्ट कार्यालयाने घायवळला तात्काळ पासपोर्टसाठीचे इतर निकष वापरुन 16 जानेवारी 2020 ला पासपोर्ट मंजुर केला आणि घायवळला पासपोर्ट मिळाला. त्यानंतर 2021 मध्ये निलेश घायवळला पुण्यातील एका दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्याने या पासपोर्टचा आधार घेतला अन् फरार झाला आहे. 2022 मध्ये घायवळला त्या गुन्ह्यात न्यायालयाकडून जामीन मिळाला. तो देताना न्यायालयाने घायवळला त्याचा पासपोर्ट पोलीसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र घायवळने त्याचा पासपोर्ट जमा केला नव्हता, अशी माहिती मिळाली आहे.
view commentsLocation :
Pune (Poona) [Poona],Pune,Maharashtra
First Published :
October 23, 2025 3:22 PM IST


