व्हा भुताने झपाटणे स्पेशालिस्ट, आला ॲानलाईन कोर्स, प्रमाणपत्रही मिळणार!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) द्वारे सुरू करण्यात येणाऱ्या या ऑनलाइन विद्यापीठातून भोंदुगिरी ओळखण्याचे प्रशिक्षण एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
पुणे : अलीकडेच पुण्यातील एका उच्चशिक्षित दाम्पत्याची तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशा अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्यांची संख्या कमी नाही. याच पार्श्वभूमीवर डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठाचे लोकार्पण अलीकडेच पुण्यात करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) द्वारे सुरू करण्यात येणाऱ्या या ऑनलाइन विद्यापीठातून भोंदुगिरी ओळखण्याचे प्रशिक्षण एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर अंधश्रद्धेविरोधात लढा दिला. त्यांच्याच विचारांना पुढे नेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून काही ऑनलाइन कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. या कोर्सेसमुळे भोंदुगिरी कशी ओळखायची, कोणत्या पद्धती वापरल्या जातात याची माहिती सामान्य नागरिकांना मिळणार आहे. यामध्ये सहा कोर्सेस उपलब्ध असून, त्यांचा अभ्यास केल्यानंतर कशाप्रकारे फसवणूक केली जाते हे समजण्यास मदत होणार आहे.
advertisement
या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरुवातीला सहा कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, अंगात येणे, भुताने झपाटणे, भ्रामक वास्तुशास्त्र, छद्म विज्ञान आणि व्यसनमुक्ती अशा विषयांचा समावेश आहे. पुढील टप्प्यात फलज्योतिषातील गैरसमज आणि मानसिक आरोग्य यांसारखे आणखी काही महत्त्वाचे कोर्सेस वाढवले जाणार आहेत.
advertisement
13 वर्षांवरील कोणीही हे कोर्सेस करू शकतो. ऑनलाइन परीक्षा यशस्वीरीत्या दिल्यानंतर प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या सहीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. परीक्षेत केवळ माहितीची उजळणी नाही, तर आकलन तपासणारे प्रश्न विचारले जातील. अभ्यासक्रमासाठी www.anisvidya.org.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. विशेष म्हणजे सर्व कोर्सेस आणि परीक्षा पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आल्या आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 21, 2025 3:09 PM IST

