advertisement

Pune Crime : पुणे पोलीस काय करतायत? डोळ्यासमोर कोयता गँगने केला हल्ला, LIVE VIDEO

Last Updated:

पुण्यात वारंवार कोयता गॅंगची दहशत पहायला मिळते. त्यामुळे कायमच लोकांच्या मनात याविषयी भीतीचं वातावरण आहे. अशातच पुण्यातून आणखी एक कोयता गॅंगची घटना समोर आलीय.

 पुणे पोलीस काय करतायत? डोळ्यासमोर कोयता गँगने केला हल्ला, LIVE VIDEO
पुणे पोलीस काय करतायत? डोळ्यासमोर कोयता गँगने केला हल्ला, LIVE VIDEO
पुणे, 28 डिसेंबर : पुण्यात वारंवार कोयता गॅंगची दहशत पहायला मिळते. त्यामुळे कायमच लोकांच्या मनात याविषयी भीतीचं वातावरण आहे. अशातच पुण्यातून आणखी एक कोयता गॅंगची घटना समोर आलीय. महिला पोलिसापुढे दोन गटात कोयत्यानं मारामारी झाल्याचं समोर आलंय. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचं चित्र पहायला मिळतंय.
वडगाव शेरी भागातील आनंद पार्क येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन गटात झालेल्या गँगवॉर मुळे स्थानिकामध्ये दहशतीच वातावरण आहे. दोन गटात झालेल्या वादात एका गटाकडून कोयत्याने हल्ला करण्यात आला. त्यांच्या या हल्ल्यामुळे परिसरातील लोक घाबरले. एकीकडे पोलीस आयुक्त रितेश कुमार गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करत असताना ही गुन्हेगारांचां उच्छाद कायम आहे.
advertisement
दरम्यान, कोयता गॅंगच्या या हल्ल्यात तीन तरुण जखमी झाले आहेत. पुन्हा एकदा कोयता गॅंगच्या दहशतीमुळे कायदा सुवव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. पोलीस समोर असतानाही त्यांची हिंमत एवढी झाली की त्यांनी हल्ला केला. यापूर्वूही पुण्यात कोयता गॅंगची दहशत पहायला मिळाली. अनेक घटना समोर आल्या मात्र तरीही अद्याप या घटनांमध्ये वाढच होत चाललेली पहायला मिळतेय.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुणे पोलीस काय करतायत? डोळ्यासमोर कोयता गँगने केला हल्ला, LIVE VIDEO
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement