Pune Metro: 'येरवडा' परिसराबाबत मोठा निर्णय, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कामाला गती

Last Updated:

Pune Metro: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामाला गती देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येरवडा येथील सरकारी जमीन थेट पीएमआरडीएकडे वर्ग केली आहे.

Pune Metro: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो, सरकारचा मोठा निर्णय अन् कामाला गती!
Pune Metro: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो, सरकारचा मोठा निर्णय अन् कामाला गती!
पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-3 प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (PMRDA) येरवडा येथील 48,600 चौ. मीटर शासकीय जमीन कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या जमीन हस्तांतरणाचा उपयोग प्रकल्पासाठी आवश्यक व्यवहार्यता तफावत निधी उभारण्यासाठी केला जाणार आहे.
पुण्यात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-3 प्रकल्पाला वेग देण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेण्यात आला असून, येरवडा येथील विविध सिटी सर्व्हे क्रमांकांमधील एकूण 48,600 चौ. मीटर जमीन पीएमआरडीएला हस्तांतरित करण्यात आली आहे. या जमिनीमध्ये सिटी सर्व्हे 2210 मधील 14,880 चौ. मीटर, सिटी सर्व्हे 2216 मधील 15,660 चौ. मीटर आणि सिटी सर्व्हे 2220 मधील 15,954 चौ. मीटर यांचा समावेश आहे. ही जमीन भांबुर्डा येथील 10 हे. 60 आर जागेच्या बदल्यात पर्यायी जागा म्हणून दिली गेली आहे. या निर्णयामुळे मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक निधी उभारणीला मदत होणार आहे.
advertisement
मेट्रोच्या कामाला गती..
पुण्यात मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी पीएमआरडीएला हस्तांतरित करण्यात आलेल्या जमिनीवर शासनाने काही अटी घातल्या आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 आणि नियम 1971 नुसार ही जमीन मोफत आणि कायमस्वरूपी कब्जेहक्काने पीएमआरडीएला दिली गेली असून, पीएमआरडीएने ती भोगवटादार वर्ग-2 म्हणून धारण करावी. जमिनीच्या व्यावसायिक विकासातून मिळणारे उत्पन्न प्रकल्पासाठी आवश्यक व्यवहार्यता तफावत निधीसाठी वापरले जाईल.
advertisement
सिटी सर्व्हे 2220 वरील शिक्षण संकुलाचे आरक्षण लवकर नगर विकास विभागाने बदलावे लागेल. ही जमीन केवळ मेट्रो प्रकल्पासाठी वापरणे बंधनकारक असून, अटींचा भंग झाल्यास शासन जमिनीला परत मिळवू शकते. तसेच, जमीन हस्तांतरणापूर्वी पुणे जिल्हाधिकाऱ्याकडून पीएमआरडीएने लेखी हमीपत्र द्यावे लागेल.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro: 'येरवडा' परिसराबाबत मोठा निर्णय, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कामाला गती
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement