Pune Accident: कंटेनरने तरुणाचे चिरडलं आयुष्य! 3 महिन्यांपूर्वी लग्न, एक क्षणात सगळं संपलं; हृदय हेलावणारा Video
- Published by:Prachi Amale
Last Updated:
गजाननचे तीन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पुणे : शिक्रापूर-तळेगाव महामार्गावर खालुब्रे चौकात एक भीषण अपघात झाला आहे. कंटेनरने दुचाकीला चिरडल्याची घटना घडली आहे. हा अपघात एवढा विचीत्र होता की या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकी चालवणारा तरुण मात्र गंभीर जखमी आहे. महत्त्वाचे म्हणजे मृत तरुणाच्या लग्नाला अवघे तीन महिने झाले होते. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, गजानन बाबुराव बोळकेकर असे मृत तरुणाचे नाव आहे. तर दुचाकीस्वाराचे नाव आदित्य गायकवाड असून तो गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी महाळुंगे पोलिसांनी कंटेनर चालकाला धारावी येथील मोहम्मद अरमान खान याला अटक केली आहे. रविवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
advertisement
सध्या पावसाळा सुरू असून रस्ता निसरडा झाला आहे. आरोपी कंटेनर चालक आपले वाहन बेदारकपणे आणि भरधाव वेगाने चालवत होता. कंटेनर चालक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवर मागे बसलेला गजानन बोळकेकर खाली फेकले गेले आणि कंटेनरच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मोटरसायकल चालविणारा थोडक्यात बचावला आहे.
advertisement
Accident : खालुब्रे चौकात दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकीवर मागे बसलेला आला ट्रकखाली pic.twitter.com/1UlUMNnqqK
— News18Lokmat (@News18lokmat) July 14, 2025
गजानन आणि आदित्य हे दोघे महाळुंगे येथील एका खासगी कंपनीत कामाला होते. यातील गजाननचे तीन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते.अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या सहकाऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. महाळुंगे पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
July 14, 2025 5:43 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Accident: कंटेनरने तरुणाचे चिरडलं आयुष्य! 3 महिन्यांपूर्वी लग्न, एक क्षणात सगळं संपलं; हृदय हेलावणारा Video


