सर्व प्रवासी बसले, पण वैमानिकानी अचानक दिला उड्डाणास नकार, कारण ऐकून पुणे विमानतळावर गोंधळ
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
Pune Flight : पुणे विमानतळावर बुधवारी दोन वेगवेगळ्या विमानांच्या वैमानिकांनी उड्डाण करण्यास नकार दिल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला
पुणे : पुणे विमानतळावर बुधवारी दोन वेगवेगळ्या विमानांच्या वैमानिकांनी उड्डाण करण्यास नकार दिल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. या प्रकारामुळे पुणे-दिल्ली आणि पुणे-अमृतसर या दोन विमानांच्या वेळापत्रकात तीन तासांहून अधिक विलंब झाला. परिणामी प्रवाशांचा खोळंबा झाला आणि त्यांनी संताप व्यक्त केला. 'माझी कामाची वेळ संपली' असं सांगून विमानांच्या वैमानिकांनी उड्डाण करण्यास नकार दिला.
नियमांचे कारण देत दिला नकार
पुणे-दिल्ली विमानाच्या वैमानिकांनी 'फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्स' (FDTL) या नियमाचा आधार घेत उड्डाण करण्यास नकार दिला. वैमानिकांना थकवा येऊ नये आणि हवाई वाहतूक सुरक्षित राहावी यासाठी DGCA ने 1 नोव्हेंबरपासून FDTL चे नवीन नियम लागू केले आहेत. विमानाचे उड्डाण सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी अपेक्षित होतं.
advertisement
वैमानिकाने नकार दिल्यानंतर दुसरा वैमानिक उपलब्ध करण्यात आला. मात्र, त्याच वेळी विमानतळावर नोटम (NOTAM) सुरू झाल्याने नागरी वाहतूक 11:30 पर्यंत बंद राहिली. अखेर, हे विमान सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी दिल्लीसाठी रवाना झालं, ज्यामुळे प्रवाशांचा तीन तास खोळंबा झाला.
advertisement
पुणे-अमृतसर (6E-721) या विमानाचे नियोजित उड्डाण मध्यरात्री 2 वाजून 55 मिनिटांनी होतं. या विमानाच्या वैमानिकानंही FDTL चं कारण देत उड्डाण करण्यास नकार दिला. यामुळे रात्री 12 वाजल्यापासून उपस्थित असलेल्या प्रवाशांना ताटकळत राहावं लागलं. अखेर, सकाळी साडेसहा वाजता दुसरा वैमानिक उपलब्ध झाल्यावर या विमानाचं उड्डाण झालं.
काय आहेत FDTL चे नवीन नियम?
DGCA ने विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी नवीन नियम कठोर केले आहेत, यानुसार
advertisement
दैनिक ड्युटी: दिवसातील कामाचा कालावधी 10 तासांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे.
रात्रीची उड्डाणे: रात्री 2 ते सकाळी 6 हा काळ 'विंडो ऑफ सर्कॅडियन लो' मानला जातो, कारण या काळात मानवी सतर्कता सर्वात कमी असते. यामुळे रात्रीच्या लँडिंगची संख्या सहावरून दोनवर मर्यादित करण्यात आली आहे.
विश्रांती: साप्ताहिक विश्रांतीचा कालावधी 36 तासांवरून वाढवून 48 तास करण्यात आला आहे.
advertisement
दरम्यान या विमानांच्या उड्डाणांना उशीर झाल्याने पुणे विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित कंपनीने (इंडिगो) तातडीने दुसऱ्या वैमानिकाचा शोध घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 27, 2025 11:55 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
सर्व प्रवासी बसले, पण वैमानिकानी अचानक दिला उड्डाणास नकार, कारण ऐकून पुणे विमानतळावर गोंधळ


