1-1 करत महिला कामगारानेच गायब केल्या दुकानातील दीड लाखाच्या साड्या; शेवटी..., पुण्यातील विचित्र घटना
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
संधीचा फायदा घेऊन या महिला कामगाराने गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत हळूहळू दुकानातील महागड्या साड्या, तसेच इतर वस्त्रे आणि साहित्य चोरून नेण्यास सुरुवात केली.
पुणे: पुण्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच आता चोरीची आणखी एक विचित्र घटना समोर आली आहे. यात शहराच्या औंध परिसरात वस्त्रदालनात (बुटीक) काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यानेच आपल्या मालकिणीचा विश्वासघात केला. तिने दुकानातील मौल्यवान साड्या आणि इतर साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीला गेलेल्या ऐवजाची किंमत सुमारे दीड लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी तक्रारदार महिलेच्या फिर्यादीवरून संबंधित कामगार महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष रेसिडेन्सी सोसायटीच्या तळमजल्यावर तक्रारदार महिलेचं वस्त्रदालन आहे. या दालनामध्ये एक महिला कामगार म्हणून कार्यरत होती. तक्रारदार महिलेचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता. मात्र, याच संधीचा फायदा घेऊन या महिला कामगाराने गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत हळूहळू दुकानातील महागड्या साड्या, तसेच इतर वस्त्रे आणि साहित्य चोरून नेण्यास सुरुवात केली.
advertisement
कामगार महिलेच्या या कृत्यामुळे दुकानातील दीड लाख रुपये किमतीचा ऐवज कमी झाला. वस्त्रदालनाच्या मालकिणीच्या (तक्रारदार) हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या चोरीच्या घटनेची गंभीर दखल घेऊन विश्वासघात करणाऱ्या महिला कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे.
advertisement
रिक्षाचालकाने परत केली बॅग -
दुसऱ्या एका घटनेत प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी आजही जिवंत असल्याचं एक उत्कृष्ट उदाहरण भोर तालुक्यातील ससेवाडी येथील रिक्षाचालक गणेश वाडकर यांनी दाखवून दिलं आहे. त्यांनी एका प्रवाशाने रिक्षात विसरलेली बॅग मालकाला परत केली. रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने मिळून सुमारे ४ ते ५ लाख रुपये किमतीची मौल्यवान बॅग तिच्या मूळ मालकापर्यंत पोहोचवली आहे.
advertisement
view comments
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 17, 2025 6:59 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
1-1 करत महिला कामगारानेच गायब केल्या दुकानातील दीड लाखाच्या साड्या; शेवटी..., पुण्यातील विचित्र घटना







