महिलेची सोन्याच्या दागिन्यांची बॅग रिक्षातच विसरली; मग पुण्यातील चालकानं जे केलं त्यावर विश्वास बसणार नाही

Last Updated:

घाईगडबडीत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली त्यांची पिशवी त्यांच्याकडून अनावधानाने रिक्षामध्येच विसरली गेली. ही गोष्ट त्यांच्या लक्षात येईपर्यंत रिक्षा खूप पुढे निघून गेली होती.

बॅग केली परत (प्रतिकात्मक फोटो)
बॅग केली परत (प्रतिकात्मक फोटो)
खेडशिवापूर: प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी आजही जिवंत असल्याचं एक उत्कृष्ट उदाहरण भोर तालुक्यातील ससेवाडी येथील रिक्षाचालक गणेश वाडकर यांनी दाखवून दिलं आहे. त्यांनी एका प्रवाशाने रिक्षात विसरलेली बॅग मालकाला परत केली. रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने मिळून सुमारे ४ ते ५ लाख रुपये किमतीची मौल्यवान बॅग तिच्या मूळ मालकापर्यंत पोहोचवली आहे.
सुरेखा माऊली गोरे (रा. खोपी, ता. भोर) या १२ डिसेंबर २०२५ रोजी कात्रज येथून एका रिक्षात बसून वेळू फाटा येथे उतरल्या. मात्र, घाईगडबडीत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली त्यांची पिशवी त्यांच्याकडून अनावधानाने रिक्षामध्येच विसरली गेली. ही गोष्ट त्यांच्या लक्षात येईपर्यंत रिक्षा खूप पुढे निघून गेली होती. रिक्षाचालकाचा कोणताही संपर्क क्रमांक किंवा माहिती नसल्याने त्यांनी खूप शोधाशोध केली, पण त्यांना यश आलं नाही. त्यांनी मौल्यवान वस्तू गमावल्याचं दु:ख त्यांच्या कुटुंबाला झालं होतं.
advertisement
दोन दिवस उलटून गेल्यानंतर, म्हणजेच १४ डिसेंबर २०२५ रोजी, ससेवाडी (ता. भोर) येथील रिक्षाचालक गणेश वाडकर यांनी मोठ्या प्रामाणिकपणे आणि प्रयत्नाने सुरेखा माउली गोरे यांचा शोध घेतला. कोणतीही वस्तू न काढता, गणेश वाडकर यांनी ती बॅग जशीच्या तशी सर्व वस्तूंसह गोरे यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सुपूर्द केली.
advertisement
गणेश वाडकर यांनी दाखवलेला हा प्रामाणिकपणा आजच्या काळात अत्यंत कौतुकास्पद आहे. या कृतीतून त्यांची नैतिक मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते. सुमारे ४ ते ५ लाखांची रक्कम आणि दागिने परत केल्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून गणेश वाडकर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
महिलेची सोन्याच्या दागिन्यांची बॅग रिक्षातच विसरली; मग पुण्यातील चालकानं जे केलं त्यावर विश्वास बसणार नाही
Next Article
advertisement
Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement