दारू पाजून अल्पवयीन मुलीवर तरुणाने केले अत्याचार, गुहागरमधील संतापजनक घटना
- Published by:Sachin S
Last Updated:
आरोपी प्रितेश सुर्वे याने या अल्पवयीन मुलीला फिरण्याच्या बहाण्याने समुद्र किनारी घेऊन गेला. तिथे त्याने अल्पवयीन मुलीला दारू पाजली
राजेश जाधव, प्रतिनिधी
गुहागर: रत्नागिरी जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला मद्य पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी २९ वर्षी नराधम तरुणाला रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी प्रितेश सुर्वे (29) ला गुहागर पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगी ही गुहागर परिसरात राहणारी आहे. मुलगी अल्पवयीन आणि मागासवर्गीय असल्यामुळे ॲट्रॉसिटी अंतर्गत आरोपी प्रितेश सुर्वेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
आरोपी प्रितेश सुर्वे याने या अल्पवयीन मुलीला फिरण्याच्या बहाण्याने समुद्र किनारी घेऊन गेला. तिथे त्याने अल्पवयीन मुलीला दारू पाजली आणि दिवसभर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार इथेच थांबला नाही. या नराधमाने पीडित मुलीला रात्री गुहागरमधील एका लॉजवर सुद्धा नेलं असल्याचं समोर आलं आहे. पीडित मुलगी रात्रभर घरी न आल्याने पालकांनी सर्वत्र शोध घेतला. पण, मुलगी कुठे आढळली नाही. त्यामुळे पालकांनी गुहागर पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
advertisement
अखेरीस दुसऱ्या दिवशी दुपारी स्वतः पीडित मुलगी घरी आली. घरी आलेल्या मुलीची अवस्था पाहून कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांची पायाखालची वाळू सरकली. त्यांनी तातडीने मुलीला घेऊन गुहागर पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. पीडित मुलीनं सगळी हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर तातडीने सूत्र फिरवत आरोपी प्रितेश सुर्वेला अटक केली. या नराधमावर गुहागर पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. मात्र, या घटनेमुळे गुहागरमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
view commentsLocation :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
December 16, 2025 11:31 PM IST









