IPL Auction 2026 : विराटच्या RCB ने लिलावात गोंधळ घातला! 8 खेळाडूंमध्ये फक्त एकच मॅच विनर घेतला

Last Updated:

आयपीएल 2026 साठीचा लिलाव अबू धाबीमध्ये पार पडला. कॅमरून ग्रीन हा यंदाच्या लिलावातला सगळ्यात महागडा खेळाडू ठरला.

विराटच्या RCB ने लिलावात गोंधळ घातला! 8 खेळाडूंमध्ये फक्त एकच मॅच विनर घेतला
विराटच्या RCB ने लिलावात गोंधळ घातला! 8 खेळाडूंमध्ये फक्त एकच मॅच विनर घेतला
मुंबई : आयपीएल 2026 साठीचा लिलाव अबू धाबीमध्ये पार पडला. कॅमरून ग्रीन हा यंदाच्या लिलावातला सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. कॅमरून ग्रीनला शाहरुख खानच्या आरसीबीने 22.50 कोटी रुपयांना विकत घेतलं. आयपीएल 2025 मध्ये आरसीबीला पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकता आली, यानंतर यंदाच्या लिलावात दुसरी ट्रॉफी जिंकण्यासाठी आरसीबी स्मार्ट स्ट्रॅटेजी घेऊन लिलावात उतरेल, असं बोललं जात होतं. पण आयपीएल लिलावात आरसीबीने गोंधळ घातला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आयपीएल 2026 च्या लिलावामध्ये आरसीबीने एकूण 8 खेळाडूंना विकत घेतलं, यापैकी फक्त व्यंकटेश अय्यर हेच नाव ओळखीचं आहे. व्यंकटेश अय्यरसाठी आरसीबीने 7 कोटींची बोली लावली. आयपीएलच्या मागच्या मोसमात केकेआरकडून खेळलेल्या व्यंकटेश अय्यरला तब्बल 23.75 कोटी मिळाले होते, पण आता अय्यरचा भाव 15 कोटींनी कमी झाला आहे.
व्यंकटेश अय्यर वगळता आरसीबीने जेकब डफी, सात्विक डेस्वाल, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विकी ओत्सवाल, विहान मल्होत्रा आणि कनिष्क चौहान यांना विकत घेतलं आहे. आयपीएल लिलावानंतर आता आरसीबीकडे 25 लाख रुपये शिल्लक आहेत. आयपीएल 2026 च्या लिलावाआधी आरसीबीकडे 16 कोटी 40 लाख रुपये शिल्लक होते, यात त्यांना 6 भारतीय आणि 2 परदेशी खेळाडू विकत घ्यायचे होते.
advertisement

आयपीएल 2026 साठी आरसीबीची टीम

रजत पाटीदार, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, कृणाल पांड्या, स्वप्निल सिंग, टीम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, जेकब बेथल, जॉश हेजलवूड, यश दयाळ, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिक सलाम, अभिनंदन सिंग, सुयश शर्मा, व्यंकटेश अय्यर, जेकब डफी, सात्विक ओत्सवाल, विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL Auction 2026 : विराटच्या RCB ने लिलावात गोंधळ घातला! 8 खेळाडूंमध्ये फक्त एकच मॅच विनर घेतला
Next Article
advertisement
Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement