Pune Traffic : पुण्याच्या रस्त्यांवरील गर्दी ओसरली, वाहतूक कोंडीतूनही सुटका, रातोरात 'चमत्कार' घडला कसा?

Last Updated:

दिवाळीच्या सुट्यांमुळे शहरातील वाहतूक एकंदर हलकी झाली असून, रस्ते तुलनेने मोकळे दिसत आहेत. नेहमीच्या गजबजलेल्या पुणे शहरात या दिवसांत वाहतूक कोंडीची समस्या कमी झाली आहे. 

दिवाळीत पुण्याचे रस्ते झाले मोकळे..
दिवाळीत पुण्याचे रस्ते झाले मोकळे..
पुणे : पुणे शहरात आणि आसपासच्या नगरात मोठ्या संख्येने बाहेरगावावरून अनेक लोक नोकरी आणि व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले आहेत. अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी इतर शिक्षण घेण्यासाठी पुण्याच्या मध्यवर्ती भागात वास्तव्यस आहेत. पण बरीच लोकही दिवाळीनिमित्त आपल्या आपल्या गावी परतल्यामुळे पुण्यातील रस्त्यांवर मागील दोन दिवसांपासून वाहतूक कमी झाली आहे.
दिवाळीच्या सुट्यांमुळे शहरातील वाहतूक एकंदर हलकी झाली असून रस्ते तुलनेने मोकळे दिसत आहेत. नेहमीच्या गजबजलेल्या पुणे शहरात या दिवसांत वाहतूक कोंडीची समस्या कमी झाली आहे. नागरिक शहराबाहेर सण साजरा करण्यासाठी किंवा गावी गेल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर गाड्यांची वर्दळ घटली आहे.
वाहतुकीतील या सुटसुटीतपणामुळे वाहनचालकांना प्रवासात मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, रस्ते मोकळे असल्याने अनेक जण वेगमर्यादा ओलांडून वाहन चालवताना दिसत आहेत. त्यामुळे अपघातांच्या घटना टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सतर्कता वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी वेगमर्यादांचे पालन करूनच वाहन चालवावे असा सल्ला वाहतूक विभागाने दिला आहे.
advertisement
शहरातील नगर रोड, शिवाजीनगर, हडपसर, कोथरूड, वारजे, बाणेर आणि वाकड परिसरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीचा भार नेहमीपेक्षा कमी झाला आहे. यामुळे वाहतूक नियंत्रण यंत्रणेलाही सुटकेचा श्वास मिळाला आहे. पोलिसांनी काही ठिकाणी विशेष गस्त घालून वेगमर्यादा पाळली जात आहे का याची तपासणी सुरू ठेवली आहे.
दिवाळीच्या सुट्टीमुळे विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वच वर्गातील नागरिक बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे शहरात वाहतुकीचा ताण कमी झाला असला, तरी सुरक्षिततेसाठी हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर बंधनकारक ठेवण्यात आला आहे. तसेच दुकानदारांना फटाक्यांच्या विक्रीदरम्यान गर्दी टाळण्यासाठी शिस्त पाळण्याचे निर्देश दिले आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic : पुण्याच्या रस्त्यांवरील गर्दी ओसरली, वाहतूक कोंडीतूनही सुटका, रातोरात 'चमत्कार' घडला कसा?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement