3.80 कोटींची फसवणूक! दुबईच्या 'डील'मध्ये पुणेकर व्यापारी अडकला; अन् अखेर अटकेचा थरार

Last Updated:

या आरोपींनी बारोट यांना केवळ दुबईत बोलावलंच नाही, तर टांझानियात नेऊन प्रत्यक्षात ७५ टन स्क्रॅप मटेरियलचा कच्चा माल दाखवला

3.80 कोटींची फसवणूक (प्रतिकात्मक फोटो)
3.80 कोटींची फसवणूक (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पुणे शहरातील व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत आरोपीला खडक पोलिसांनी जेरबंद केलं आहे. दुबई आणि टांझानिया देशातून कमी दरात स्क्रॅप मटेरियल (कच्चा माल) निर्यात करण्याच्या बहाण्याने तो कोट्यवधी रुपयांची फसवणूक करायचा. सध्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या भूपेंद्र सिंग ऊर्फ संजय कुमार राघव याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. रविवार पेठेतील तांब्याचे भांडे व्यावसायिक सुधीर रघुनाथ बारोट यांनी खडक पोलीस ठाण्यात या फसवणुकीची तक्रार दिली होती.
सुधीर बारोट यांना त्यांच्या व्यवसायासाठी कायम कच्च्या मालाची आवश्यकता असते. याच गरजेपोटी डिसेंबर 2023 ते ऑगस्ट 2024 या काळात त्यांची मुंबईतील 'इंडो अर्फी मेटल्स को. एलएलसी' आणि 'सबपर्ला इंटरनॅशनल एलएलपी'चे मालक भूपेंद्र सिंग ऊर्फ संजय कुमार आणि त्याचा मुलगा प्रन्वीरसिंग संजय कुमार राघव यांच्याशी ओळख झाली. आरोपींनी त्यांना दुबईत आपली कार्यालये असल्याचे भासवून मागणीनुसार स्क्रॅप मटेरियल पुरवठा करण्याची हमी दिली. या आरोपींनी बारोट यांना केवळ दुबईत बोलावलंच नाही, तर टांझानियात नेऊन प्रत्यक्षात ७५ टन स्क्रॅप मटेरियलचा कच्चा माल दाखवला, जेणेकरून बारोट यांचा विश्वास बसला.
advertisement
मालाची निर्यात भारतातील गुजरातमधील मुंद्रा पोर्ट येथे करण्याचा करार करण्याचं आश्वासन देऊन आरोपींनी बारोट यांच्याकडून व्यवहारापोटी ३ कोटी ८० लाख रुपये अबूधाबी बँक (दुबई, यूएई) येथील बँक खात्यावर स्वीकारले. मात्र, ठरल्याप्रमाणे बारोट यांना कोणताही कच्चा माल मिळाला नाही आणि त्यांची रक्कमही त्यांना परत मिळाली नाही. एवढेच नव्हे, तर याच आरोपींनी पर्वती दर्शन परिसरात राहणारे मिलिंद रवींद्र नाशिककर यांचीही अशाच पद्धतीने तब्बल ९० लाखांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे.
advertisement
दरम्यान, आरोपी भूपेंद्र हा पश्चिम बंगालकडे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खडक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत भूपेंद्रला ताब्यात घेतले आणि अटक केली. न्यायालयाने त्याला २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
3.80 कोटींची फसवणूक! दुबईच्या 'डील'मध्ये पुणेकर व्यापारी अडकला; अन् अखेर अटकेचा थरार
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement