Pune Crime : पुणे हादरलं! विश्रांतवाडी परिसरात सापडल्या जिलेटिनच्या कांड्या, पोत्यात सापडल्या संशयास्पद वस्तू

Last Updated:

Pune Crime Gelatin sticks found : बॉम्बमध्ये वापरल्या जाणाऱ्या जिलेटिन कांड्या आणि वायरसारखे हे साहित्य असल्याने त्यांनी जराही वेळ न घालवता पोलिसांना बोलावण्यात आलं.

Pune Vishrantwadi Gelatin sticks
Pune Vishrantwadi Gelatin sticks
Pune Vishrantwadi Gelatin sticks : पुण्यातील विश्रांतवाडी-टिंगरेनगर परिसरात एका घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. विद्यानगर गल्ली नंबर 8, साईकृपा लॉजजवळ मोकळ्या जागेत काही संशयास्पद वस्तू आढळल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही जणांकडे बॉम्बेसाठी वापरल्या जाणाऱ्या जिलेटिनच्या कांड्या सापडल्याने मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं आहे.

जिलेटिन कांड्या सापडल्या? 

सफाई कर्मचारी नेहमीप्रमाणे आपले काम करत असताना त्यांना मोकळ्या प्लॉटलगत एका पोत्यात काही वस्तू दिसल्या. बॉम्बमध्ये वापरल्या जाणाऱ्या जिलेटिन कांड्या आणि वायरसारखे हे साहित्य असल्याने त्यांनी जराही वेळ न घालवता पोलिसांना बोलावले. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिसराची नाकाबंदी केली.

विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

advertisement
या प्रकरणी दोन मजुरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिलेटिन कांड्या बेकायदेशीरपणे जवळ बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

साहित्य नेमकं कशासाठी वापरलं?

पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर हे साहित्य नेमके कशासाठी वापरले जात होते, याचा खुलासा झाला. प्राथमिक माहितीनुसार, हे जिलेटिन खडक फोडण्यासाठी वापरले जात होते आणि ते बांधकाम करणाऱ्या मजुरांकडे आढळून आले. पण पोलिसांनी इतर अँगलने देखील चौकशी सुरू केली आहे.
advertisement

161 जिलेटिनच्या कांड्या जप्त

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी उत्तराखंड पोलिसांनी अल्मोरा येथील एका सरकारी शाळेच्या परिसरातून 161 जिलेटिनच्या कांड्या जप्त करण्यात आल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात शक्तिशाली स्फोटके आढळून आल्याने खळबळ उडाली असून परिसरात सुरक्षा कडक करण्यात आली होती.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुणे हादरलं! विश्रांतवाडी परिसरात सापडल्या जिलेटिनच्या कांड्या, पोत्यात सापडल्या संशयास्पद वस्तू
Next Article
advertisement
Raj Thackeray :  'पोटातली मळमळ ओकतायत!”, ‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त, “आधी मुंबई, मग संपूर्ण एमएमआर...”
'पोटातली मळमळ ओकतायत”,‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त,“ संपूर्ण MMR...
  • पोटातली मळमळ ओकतायत!”, ‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त, “आधी मुंबई, मग संपूर्ण

  • पोटातली मळमळ ओकतायत!”, ‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त, “आधी मुंबई, मग संपूर्ण

  • पोटातली मळमळ ओकतायत!”, ‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त, “आधी मुंबई, मग संपूर्ण

View All
advertisement