Pune Crime: पुणे हादरलं! एकतर्फी प्रेमाचा थरार; तरुणीला रस्त्यात अडवलं, आधी जबर मारहाण, मग घडलं भयंकर
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आरोपी समीर हा गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने अनेकदा तरुणीचा पाठलाग करून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता.
पुणे : पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एकतर्फी प्रेमातून एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला मारहाण आणि विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव समीर अकबर हाश्मी (वय २५, रा. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर) असे आहे. फिर्यादी तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून, आरोपी समीर हा गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने अनेकदा तरुणीचा पाठलाग करून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता.
advertisement
मारहाण आणि विनयभंग: पीडित तरुणीने आरोपीच्या मागणीला प्रतिसाद न दिल्याने, संतापलेल्या समीरने तिला अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता त्याने तिला बेदम मारहाण करून तिचा विनयभंग केला. या घटनेमुळे घाबरलेल्या तरुणीने तातडीने पालकांसह लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.
तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि आरोपी समीर हाश्मीला अटक केली. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. मात्र, भरदिवसा रस्त्यात घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 8:25 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: पुणे हादरलं! एकतर्फी प्रेमाचा थरार; तरुणीला रस्त्यात अडवलं, आधी जबर मारहाण, मग घडलं भयंकर








