Pune Crime : पुण्यात पुन्हा 'ड्रंक अँड ड्राईव्ह'चा थरार! दारुच्या नशेत डिलिव्हरी बॉयला उडवलं, पाहा अंगावर काटा आणणारा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Delivery Boy Hit Drunk And Drive : धडक इतकी भीषण होती की, तो खाली पडल्यानंतर कारचे चाक थेट त्याच्या छातीवरून गेले, ज्यामध्ये त्याच्या बरगड्या फॅक्चर झाल्या आहेत.
Pune Delivery Boy Accident : पुण्यातील रस्त्यांवर बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत असून, मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्यांमुळे निष्पाप लोकांचा जीव धोक्यात येत असल्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. अशीच एक मन सुन्न करणारी घटना नुकतीच समोर आली असून, यामध्ये एका डिलिव्हरी बॉय गंभीर दुखापत झाली आहे. उच्चभ्रू वस्ती आणि वर्दळीच्या रस्त्यांवर घडणाऱ्या अशा घटनांमुळे पुणेकरांनी पोलिस प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.
भरधाव कारची जोरदार धडक
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद दिलीप मिसाळ हा २६ वर्षीय तरुण डिलिव्हरी बॉय (Delivery boy) म्हणून काम करतो. तो आपली ड्युटी करत असताना चांदणी चौक परिसरात एक ऑर्डर आली, त्यामुळे त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली होती. मात्र, त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव कारने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, तो खाली पडल्यानंतर कारचे चाक थेट त्याच्या छातीवरून गेले, ज्यामध्ये त्याच्या बरगड्या फॅक्चर झाल्या आहेत.
advertisement
पाहा Video
Pune - A young Swiggy delivery boy waiting by the roadside after receiving an order at Chandni Chowk was violently struck by a speeding car driven by an allegedly intoxicated driver. The victim had parked his vehicle on the stand and was standing nearby when the car rammed into… pic.twitter.com/qzlQq2lKfB
— NextMinute News (@nextminutenews7) December 19, 2025
advertisement
डिलिव्हरी बॉयचा प्रकृती चिंताजनक
या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कार चालकाचे नाव तेजस बाबुलाल चौधरी असे आहे. अपघातानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता, त्याने मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन केल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित केले आहे. सध्या जखमी प्रसादवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपीवर ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 12:19 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुण्यात पुन्हा 'ड्रंक अँड ड्राईव्ह'चा थरार! दारुच्या नशेत डिलिव्हरी बॉयला उडवलं, पाहा अंगावर काटा आणणारा Video










