Pune : कुख्यात गँगस्टर गजा मारणे जेलमधून बाहेर येताच पत्नी अजित पवारांच्या भेटीला, पुण्याच्या निवडणुकीत 'तिसरी गँग' उतरणार?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Jayashree Marne meet Ajit Pawar : पंधरा दिवसांपूर्वी कुख्यात गँगस्टर गजा मारणे याची जेलमधून सुटका झाली होती. अशातच आता गजा मारणेची पत्नी आणि माजी नगरसेविका जयश्री मारणे या अजित पवारांच्या भेटीला पोहोचल्या आहेत.
Jayashree Marne meet Ajit Pawar : पुण्यात मागील काही दिवसांपूर्वी गुन्हेगारीने मोठा धुमाकूळ घातला होता. पुणे पोलिसांनी खाकी दाखवल्यानंतर गुन्हेगारी विश्वातील टोळी आता शांत झाल्या आहेत. आंदेकर टोळी, गजा मारणे टोळी तसेच घायवळ टोळीविरुद्ध पुणे पोलिसांनी कारवाई केल्यानंतर या टोळीतील सदस्य आता राजकारणाकडे वळाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. अशातच आता माजी नगरसेविका राहिलेल्या आणि गुंड गजा मारणे याच्या पत्नी जयश्री मारणे या अजित पवार यांच्या भेटीला गेल्या आहेत.
जयश्री मारणे अजित पवारांच्या भेटीला
जयश्री मारणे अजित पवारांच्या भेटीसाठी बारामती हॅास्टेलला पोहोचल्या. गजा मारणेची पत्नी माजी नगरसेविका राहिल्या आहेत. जयश्री यांनी 2012 साली पुण्यामध्ये कोथरुडमधून पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. यावेळेस त्या मनसेच्य़ा तिकिटावर निवडूनही आल्या होत्या. आता 2022 मध्ये जयश्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अशातच आता त्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत उभा राहण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळतीये.
advertisement
तिसरी टोळी देखील निवडणुकीच्या रिंगणात
पुण्यातील गुन्हेगारी विश्वातील लोकांची राजकारणाकडे वाटचाल सुरू असल्याचं पहायला मिळालं होतं. लंडनला पळून गेलेला निलेश घायवळचा भाऊ देखील निवडणुकीत उभा राहणार होता. तसेच बंदू आंदेकर टोळीतील तिघांनी निवडणुकीत उभं राहण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. अशातच आता तिसरी टोळी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. जयश्री मारणे यांना राष्ट्रवादी तिकीट देणार का? असा सवाल विचारला जात आहे.\
advertisement
मुरलीधर मोहोळ यांच्याशी पंगा
दरम्यान, केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी पंगा घेतल्याने गजा मारणे याची तुरूंगात रवानगी झाली होती. अशातच आता गजा मारणे राजकीय मंजावर देखील आपली ताकद दाखवण्याची तयारी करत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 11:00 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : कुख्यात गँगस्टर गजा मारणे जेलमधून बाहेर येताच पत्नी अजित पवारांच्या भेटीला, पुण्याच्या निवडणुकीत 'तिसरी गँग' उतरणार?











