Pune Tunnel: पुण्यात होणार 28 किलोमीटर लांबीचा बोगदा, युद्धपातळीवर खोदाई सुरू, कसा असेल मार्ग?

Last Updated:

Pune Tunnel: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. खडकवासला येथून 28 किलोमीटर लांबीचा बोगदा होणार आहे. याला पर्यावरण मंडळाने मंजुरी दिलीये.

Pune Tunnel: पुण्यात होणार 28 किलोमीटर लांबीचा बोगदा, युद्धपातळीवर खोदाई सुरू, कसा असेल मार्ग?
Pune Tunnel: पुण्यात होणार 28 किलोमीटर लांबीचा बोगदा, युद्धपातळीवर खोदाई सुरू, कसा असेल मार्ग?
पुणे: पुण्यातील खडकवासला ते फुरसुंगी या मार्गावर 28 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार होणार आहे. बोगदा करण्यास जलसंपदा विभागाला केंद्र सरकारच्या पर्यावरण मंडळाने मंजुरी दिली आहे. कामाच्या पहिल्या टप्प्यात वडाचीवाडी आणि उरुळी देवाची या दोन ठिकाणांवरून कामाची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच खडकवासला ते फुरसुंगी मार्गावर बोगदा तयार करण्यास ब्लास्टिंगचे काम देखील सुरू करण्यात आले आहे.
खडकवासला धरणातून होत असलेली पाण्याची गळती, चोरी थांबवण्यासाठी हा बोगदा तयार करण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने तयार केला होता. पुणे पर्यावरण मंडळाने या प्रकल्पाला अंतिम मंजुरी दिल्याचं पत्र जलसंपदा विभागाला दिलं आहे. हैदराबाद येथील एका कंपनीला काम देण्यात आले असून, पुढच्या अडीच वर्षांत हे काम पूर्णत्वास जाईल.
advertisement
ब्लास्टिंग परवानगी घेऊन कामाला सुरुवात
पोलीस खात्यासह इतर अनेक खात्यांची परवानगी ब्लास्टिंगसाठी घेण्यात आलेली आहे. कंपनीने आर एम सी प्लांट, क्रशर आणि प्रयोगशाळा सुरू केली आहे. आता सुरू झालेल्या कामावर ‘क्वालिटी युनिट कंट्रोल’ लक्ष ठेवत आहे. बोगदा करताना आवश्यक त्या चाचण्या करण्यात येणार आहेत.
कामासाठी एकूण 150 कर्मचारी
बोगद्याचे काम पहिल्या टप्प्यात वडाची वाडी ते उरुळी देवाची इथे सुरू झालं. कात्रज आणि धायरी भागात दुसऱ्या टप्प्यात सुरू होईल. हैदराबाद येथील कंपनीने या कामासाठी दीडशे कर्मचारी पुण्यात नियुक्त केले आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये इंजिनिअरपासून ते प्रकल्प व्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Tunnel: पुण्यात होणार 28 किलोमीटर लांबीचा बोगदा, युद्धपातळीवर खोदाई सुरू, कसा असेल मार्ग?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement