Pune Accident : कोथरूड हादरलं! काळ्या थारने 5 ते 6 गाड्या उडवल्या, CCTV व्हिडीओमध्ये सगळंच समोर
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Kothrud Accident Video : पुण्यातील कोथरूड परिसरात अपघात घडल्याचं समोर आलंय. पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपघात घडला. मद्यप्राशन करत कार चालकाने वाहनांना धडक दिली.
Pune Crime News : पुण्यात गेल्या काही काळात गुन्हेगारीसह अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र आहे. अशातच पुणे शहरातल्या कोथरूड परिसरात (Pune Kothrud Accident) आज एक अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या एका कारने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पाच ते सहा दुचाकींना जोरदार धडक (speeding car hit five to six bikes parked) दिली. हा अपघात अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ (CCTV Video) देखील समोर आला आहे.
गाडीचं नियंत्रण सुटलं अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालक मद्यपान (car driver hit the vehicles while drunk) करून गाडी चालवत होता आणि त्यामुळेच त्याचे नियंत्रण सुटले व त्याने उभ्या असलेल्या दुचाकींना उडवले. सुदैवाने या अपघातात (No one injured in accident) कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि कुणीही जखमी झालेले नाही.
advertisement
पाहा Video
Pune Accident : कोथरूडमध्ये काळ्या थारने 5 ते 6 गाड्या उडवल्या, CCTV व्हायरल!#Pune #Accident #CCTV pic.twitter.com/lW0iFKbEXj
— News18Lokmat (@News18lokmat) May 11, 2025
चालकाविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, या अपघाताचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ (CCTV of the accident goes viral) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात भरधाव कार दुचाकींना धडक देताना दिसत आहे. अलंकार पोलीस स्टेशनमध्ये या मद्यधुंद कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
advertisement
दरम्यान, पुण्यातून गुन्हेगारीच्या घटना देखील समोर येत आहेत. पुण्यात (Pune Crime) वास्तव्यास असलेल्या तरुणीने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आणि सोशल मीडियावर पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याची तक्रार पुणे (Pune Crime) शहरातील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
May 11, 2025 1:50 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Accident : कोथरूड हादरलं! काळ्या थारने 5 ते 6 गाड्या उडवल्या, CCTV व्हिडीओमध्ये सगळंच समोर


