Pune : लिव्ह इन पार्टनरचा मर्डर, महिलेच्या मृतदेहासोबत घृणास्पद कृत्य, डेडबॉडीसमोरचं दृश्य पाहून पुणे हादरलं

Last Updated:

लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या महिलेची निघृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. हत्येनंतर आरोपीने महिलेच्या मृतदेहासोबत घृणास्पद कृत्य केलं आहे.

लिव्ह इन पार्टनरचा मर्डर, महिलेच्या मृतदेहासोबत घृणास्पद कृत्य, डेडबॉडीसमोरचं दृश्य पाहून पुणे हादरलं (AI Image)
लिव्ह इन पार्टनरचा मर्डर, महिलेच्या मृतदेहासोबत घृणास्पद कृत्य, डेडबॉडीसमोरचं दृश्य पाहून पुणे हादरलं (AI Image)
पुणे : लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या महिलेची निघृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. हत्येनंतर आरोपीने महिलेचा मृतदेह दोन दिवस घरातच ठेवून नंतर उकिरड्यावर फेकला. 40 वर्षांच्या या महिलेची हत्या किरकोळ वादातून झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपीने महिलेची हत्या केली आणि तिचा मृतदेह घरामध्येच दोन ते तीन दिवस ठेवला, पण मृतदेहातून दुर्गंधी यायला लागल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना संशय येईल, म्हणून आरोपीने स्मशानभूमीजवळ असलेल्या उकिरड्यावर महिलेचा मृतदेह फेकला.
पुण्याच्या येरवडा भागामध्ये ही घटना घडली आहे. येरवडा पोलिसांनी याप्रकरणात रवी साबळे (वय 35) आणि त्याचे वडील रमेश साबळे (वय 65) या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला आणि संशयित आरोपी रवी साबळे हे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते. 14 नोव्हेंबरला त्यांच्यामध्ये किरकोळ भांडण झालं, या भांडणात रवीने महिलेला लाकडी दांडका आणि विटेने मारहाण केली, ज्यात महिलेचा मृत्यू झाला.
advertisement
महिलेचा मृत्यू झाल्याचं लक्षात येताच रवी साबळेने 14 आणि 15 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास मृतदेह रिक्षामध्ये टाकला. रवी साबळे आणि त्याचे वडील रमेश साबळे हे दोघं हा मृतदेह घेऊन लोहगाव-वाघोली रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमीजवळ गेले, तिथे असलेल्या कचराकुंडीजवळ त्यांनी मृतदेह फेकला.
परिसरामध्ये अनोळखी मृतदेह पाहताच स्थानिकांनी पोलिसांना बोलावलं, यानंतर पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले, तेव्हा त्यांना रवी साबळे आणि रमेश साबळे रिक्षातून मृतदेह घेऊन आल्याचं दिसलं. यानंतर पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली. महिलेचा मृतदेह पोलिसांनी ससून रुग्णालयात पाठवला, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये महिलेचा मृत्यू ब्लंट फोर्स ट्रॉमामुळे झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune : लिव्ह इन पार्टनरचा मर्डर, महिलेच्या मृतदेहासोबत घृणास्पद कृत्य, डेडबॉडीसमोरचं दृश्य पाहून पुणे हादरलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement