PMC Election : पुण्यात मोठा गोलमाल? EVM वर मतदान केलं पण मत कुणाला गेलं कळेना, मतदार केंद्रावर राडा
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Municipal Corporation Election 2026 Voting : मत नक्की कुणाला पडलं पाहण्यासाठी आवश्यक असलेली व्हीव्हीपीएटी (VVPAT) यंत्र यावेळी मशीनसोबत जोडलेली नव्हती. आपली मते योग्य उमेदवारालाच गेली आहेत का, याची पडताळणी करता येत नसल्याने नागरिक संभ्रमात होते.
Pune Municipal Corporation Election : पुणे शहरात सध्या लोकशाहीचा उत्सव सुरू असतानाच, काही भागांत प्रशासकीय नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिक सकाळपासूनच घराबाहेर पडले खरे, पण मतदान केंद्रांवरील अव्यवस्था पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. सुसगाव भागातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये ईव्हीएम (EVM) यंत्रणेबाबत अत्यंत गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. मतदारांना आपले मत नक्की कुणाला पडलं? याचा पत्ताच लागला नाही.
मतदान एजंटने यंत्रणा तपासली
मत नक्की कुणाला पडलं पाहण्यासाठी आवश्यक असलेली व्हीव्हीपीएटी (VVPAT) यंत्र यावेळी मशीनसोबत जोडलेली नव्हती. आपली मते योग्य उमेदवारालाच गेली आहेत का, याची पडताळणी करता येत नसल्याने नागरिक संभ्रमात होते. या मुद्द्यावरून मतदारांनी जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला, तेव्हा त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत. केवळ मतदान एजंटने यंत्रणा तपासली आहे, असे सांगून अधिकाऱ्यांनी हात झटकल्याचा आरोप होत आहे.
advertisement
यंत्र सोबत ठेवण्यास नकार दिला
या प्रकरणात विरोधी पक्षांनी आधीच निवडणूक आयोगाकडे व्हीव्हीपीएटी यंत्रांची मागणी केली होती आणि हा लढा कोर्टापर्यंतही पोहोचला होता. मात्र, आयोगाने कोर्टातही ही मागणी फेटाळून लावत ही यंत्र सोबत ठेवण्यास नकार दिला होता. परिणामी, मतदारांना आपल्या मताची खात्री करून घेण्याची कोणतीही संधी आज उपलब्ध नव्हती. या तांत्रिक वादासोबतच मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने संपूर्ण परिसरात एक प्रकारचे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
एकूण 5 मतदान केंद्रांवर EVM मशीन बंद
दरम्यान, पुण्यात महात्मा गांधी उर्दू शाळा गुरुवार पेठ प्रभाग क्रमांक 26 या ठिकाणीही दोन ठिकाणी मशीन बंद आहेत. मतदाराची सिक्वेन्स ही चुकलेले दिसले. अ ब क ड नुसार सिक्वेन्स नसल्याचं दिसून आलं. पुण्यात अनेक ठिकाणी मतदानावेळी EVM मशीन बंद पडल्याचं दिसून आलं. एकूण 5 मतदान केंद्रांवर EVM मशीन बंद असल्याचं समोर आलं होतं. प्रभाग क्रमांक २४,२५ ,२६ आणि ३३ मध्ये अनेक मतदान केंद्राच्या बाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 9:40 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
PMC Election : पुण्यात मोठा गोलमाल? EVM वर मतदान केलं पण मत कुणाला गेलं कळेना, मतदार केंद्रावर राडा










