Pune News: बिबट्या नरभक्षक कसा होतो? पुण्याच्या ग्रामीण भागातील धक्कादायक आकडेवारी
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्या कसा आणि कधी पकडणार? की त्याला ठार मारणार? याबाबत जुन्नर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्याशी आमचे 'लोकल 18'चे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी बातचीत केली आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढली असून बिबट्याचे हल्लेही वाढले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील सुमारे 56 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याचे केंद्र बनली असून, केवळ एका महिन्यात पिंपरखेडमध्ये 3 मृत्यू झाले आहेत. 13 वर्षीय रोहन बोंबे या मुलाचा बळी गेल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी थेट पुणे-नाशिक महामार्ग 5 तासांहून अधिक काळ रोखून धरला. दरम्यान, यावेळी पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्या कसा आणि कधी पकडणार? की त्याला ठार मारणार? याबाबत जुन्नर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्याशी आमचे 'लोकल 18'चे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी बातचीत केली आहे.
'लोकल 18' सोबत संवाद साधताना वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणाले की, "नरभक्षक बिबट्या म्हणजे, जो बिबट्या वेगवेगळ्या माणसांवर पुन्हा पुन्हा हल्ला करतो, त्याला नरभक्षक बिबट्या म्हटलं जातं. त्याच्या स्वॅब टेस्टिंग करून बिबट्याला वनविभाग जेरबंद करतात. हल्ला केलेल्या माणसाच्या बॉडीतल्या डीएनएतून सॅम्पल आम्ही घेतो. ज्या दिवशी बिबट्या हल्ला करतो, त्याचदिवशी आम्ही बॉडीचा सॅम्पल घेतो. त्यातूनच नरभक्षक बिबट्या म्हणून घोषित करतो. ड्रोनच्या माध्यमातून वनविभाग पुणे जिल्ह्यात बिबट्याचं सर्च ऑपरेशन करणार आहोत. रात्रीच्या वेळी थर्मल ड्रोनच्या सहाय्याने बिबट्या किती आहेत हे. शोधणार आहोत. त्यानंतर आम्ही शूट करणार आहोत. महाराष्ट्र शासनाने वनविभागाला शूट करण्याचे आदेश दिलेले आहेत. जर बिबट्या तावडीत नाही सापडला तर, त्याला शूटच करावा लागणार आहे."
advertisement
जुन्नर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण बाईट
तालुक्यामध्ये जवळपास 1200 पर्यंत बिबट्यांची संख्या आहे. पुन्हा एकदा बिबट्याने मानवी वस्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आतापर्यंत जवळपास 56 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. बिबट्यांचे मानवी वस्तीत हल्ले वाढले असताना नागरिकांनी तालुक्यामध्ये आंदोलन सुरू केलं आहे. पुणे नाशिक महामार्गावर संतप्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता अधिक तीव्र स्वरूप येताना दिसत आहे. आज सकाळी 10:30 वाजल्यापासून मंचर मधील नंदी चौकात हे आंदोलन सुरू आहे. संतप्त शेतकऱ्यांच्या मागणीला कोणतेच यश येताना दिसत नाही, त्यामुळे आता पुणे नाशिक महामार्गालगत असणारे सर्व पर्यायी रस्ते देखील बंद करण्याची भूमिका ही आंदोलक घेताना दिसताहेत.
advertisement
आज दिवसभर या पर्यायी मार्गांचा वापर केल्याने पुणे नाशिक महामार्गावरील वाहतुकीला अधिक कोंडीचा सामना करावा लागला नाही. मात्र आता संतप्त शेतकऱ्यांनी जर हे पर्यायी मार्ग बंद केले. तर या महामार्गावरून आणि पर्यायी मार्गावरून वाहतूक रोखली गेली तर याचा मोठा परिणाम हा दिसून येईल आता सरकारला कोंडीत पकडण्यासाठी या भागातील शेतकरी सरसावले आहेत. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या रोहन बोंबे याचा मृतदेह ज्या ॲम्ब्युलन्स मध्ये ठेवला आहे ती ॲम्ब्युलन्स देखील आता आंदोलनस्थळी आणून उभी करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 03, 2025 8:44 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: बिबट्या नरभक्षक कसा होतो? पुण्याच्या ग्रामीण भागातील धक्कादायक आकडेवारी

