Pune Ganeshotsav : पुण्यात रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी विशेष उपक्रम; आता ऑनलाईन स्क्रीनवरून मिळणार बाप्पाचे आशीर्वाद

Last Updated:

Dagdusheth Ganpati : रुग्णालयात दाखल असलेल्या भक्तांना मंडपात प्रत्यक्ष जाता येत नसल्याने त्यांच्यासाठी ऑनलाईन स्क्रीनवरून व्हर्च्युअल दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. 360° कॅमेऱ्यांच्या साहाय्याने रुग्णांना आपल्या खाटेवरूनच बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे.

News18
News18
पुणे : आजारपणामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या अनेक गणेशभक्तांसाठी, ज्यांना प्रत्यक्ष गणेशोत्सवात सहभागी होणे शक्य नाही, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे 'आभासी दर्शन' ही सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे. यंदाच्या सजावटीत उभे राहून, गुरुजींच्या शेजारी आरतीमध्ये सहभागी होण्याचा अनुभव रुग्णांनी 'व्हर्च्युअल रिअॅलिटी'च्या माध्यमातून अनुभवला. रुग्णालयातील खाटेवरूनही गणरायाचे दर्शन घेता आले, यामुळे अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू वाहले.
भक्ती आणि सेवेच्या परंपरेला पुढे नेत, जे रुग्ण प्रत्यक्ष उत्सवात येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने 'इमर्सिव्ह दर्शन' ही सुविधा सुरु केली आहे. अजय पारगे आणि संजय पारगे यांनी पुढाकार घेत हा अभिनव उपक्रम राबविला आहे. यानिमित्ताने मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय आणि कसबा पेठेतील सूर्या सह्याद्री रुग्णालयातील रुग्णांनी दर्शनाचा आनंद अनुभवला.
advertisement
आजारपणामुळे रुग्णांना रस्त्यावर जाऊन उत्सवात सहभागी होणे शक्य नसते. मात्र, आता फक्त मनात गणरायाचे रूप ठेवण्याची गरज नाही. 'व्हर्च्युअल रिअॅलिटी'च्या माध्यमातून, रुग्ण मूर्तीसमोर उभे राहून दर्शन घेऊ शकतात आणि आरतीमध्ये नतमस्तक होण्याची भावना प्रत्यक्ष अनुभवू शकतात. अनेक रुग्ण या प्रक्रियेत लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करताना दिसले.
हा सेवा उपक्रम नऊ वर्षांपूर्वी, 2016 मध्ये सुरू झाला. अध्यात्म आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून, या उपक्रमाने अनेक रुग्णांच्या आयुष्यात आनंदाचा अनुभव दिला आहे. पारगे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीने या परंपरेला आधुनिक मार्गाने पुढे नेले आहे. उपक्रमाची अंमलबजावणी डिजिटल आर्ट कीआई प्रा. लि. कंपनीद्वारे केली जाते.
advertisement
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती 360 अंशांच्या कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्ड केली असून, ती आता रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे, आजारपणामुळे खाटेवर अडकलेल्या रुग्णांनाही गणेशोत्सवात सहभागी झाल्याचा अनुभव घेता येतो, भक्तीचा आनंद अनुभवता येतो आणि गणरायाप्रती कृतज्ञता व्यक्त करता येते. हा अभिनव उपक्रम रुग्णांसाठी भक्ती, तंत्रज्ञान आणि सेवा यांचे अद्भुत मिश्रण ठरला आहे आणि गणेशोत्सवाच्या परंपरेला पुढे नेण्याचा आदर्श उदाहरण ठरतो.
मराठी बातम्या/पुणे/
Pune Ganeshotsav : पुण्यात रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी विशेष उपक्रम; आता ऑनलाईन स्क्रीनवरून मिळणार बाप्पाचे आशीर्वाद
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement