येरवडा कारागृहात पुन्हा रक्तरंजित थरार! खुनाच्या घटनेनंतर आता वृद्ध कैद्यासोबत घडलं धक्कादायक
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या फजल अहमद अब्दुलकयुम अन्सारी या कैद्याने गराळे यांना अत्यंत क्रूरपणे मारहाण केली. ही मारहाण इतकी भयंकर होती की, गराळे यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला आहे
पुणे : पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारागृहातील अंतर्गत वादातून एका ६५ वर्षीय वृद्ध कैद्याला अमानुष मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात संबंधित कैदी गंभीर जखमी झाला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, देवकरप्पा गराळे (वय ६५) असे जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या फजल अहमद अब्दुलकयुम अन्सारी या कैद्याने गराळे यांना अत्यंत क्रूरपणे मारहाण केली. ही मारहाण इतकी भयंकर होती की, गराळे यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
advertisement
याप्रकरणी कारागृह हवालदार प्रकाश भोसले यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी कैदी फजल अन्सारी याच्यावर गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सी. बी. बेरड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
advertisement
कारागृहातील हिंसेचे सत्र सुरूच: येरवडा कारागृहात गेल्या काही दिवसांपासून हिंसक घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच एका कैद्याचा फरशीने ठेचून खून करण्यात आला होता. ती घटना ताजी असतानाच आता पुन्हा एका वृद्धाला झालेल्या अमानुष मारहाणीमुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 10:43 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
येरवडा कारागृहात पुन्हा रक्तरंजित थरार! खुनाच्या घटनेनंतर आता वृद्ध कैद्यासोबत घडलं धक्कादायक











