VIDEO : लाथाबुक्क्यांनी मारलं, कोयत्याचे सपासप वार...पुण्यात जमिनीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पुण्याच्या शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत जमिनीच्या वादातून दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत लाथा बुक्क्यांनी मारहाण झाल्याची आणि कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे.
Pune News: सचिन तोडकर, प्रतिनिधी शिरूर, पुणे : पुण्याच्या शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत जमिनीच्या वादातून दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत लाथा बुक्क्यांनी मारहाण झाल्याची आणि कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील निर्वि येथे ही घटना घडली होती. या घटनेत जमीनीचा ताबा घेण्याच्या मुद्द्यावरून दोन गटात तुफान राडा झाला होता. यावेळी दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली होती.
या घटनेत दोन्ही गटातील महिला आणि पुरुष एकमेकांना लाठी काठी आणि कोयत्याने एकमेकांना मारहाण करताना दिसत आहे. या मारहाणीची संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे.तसेच या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या घटनेत किती जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.तसेच या जखमींची नावे काय आहेत. याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही आहे.पण या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
advertisement
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील जखमींवरती सध्या शिरूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 11, 2025 7:30 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
VIDEO : लाथाबुक्क्यांनी मारलं, कोयत्याचे सपासप वार...पुण्यात जमिनीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी