पुणेकरांनो घराला कुलूप लावा अन् बिनधास्त गावी जा; दिवाळीत पुणे पोलिसांचा मोठा निर्णय
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune News: दिवाळीला गावी जणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्ही घराला कुलूप लावून बिनधास्त गावी जाऊ शकता. पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
पुणे – दिवाळी हा आनंदाचा आणि कुटुंबीयांच्या एकत्र येण्याचा सण असला, तरी या काळात घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता अधिक असते. दिवाळीनिमित्त पुणेकर मोठ्या संख्येने आपल्या गावी जात असल्याने, त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा चोरटे घेऊ नयेत, यासाठी पोलिसांनी सुरक्षा उपाययोजना अधिक कडक केल्या आहेत.
वाघोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांनी नागरिकांना सजग राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दिवाळीपूर्व सुरक्षा मार्गदर्शन सत्रात हांडे यांनी नागरिकांशी संवाद साधला. या सत्राला विविध सोसायट्यांचे रहिवासी, सोसायटी पदाधिकारी तसेच वाघोली पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
advertisement
या वेळी हांडे म्हणाले, दिवाळीच्या सुट्टीदरम्यान अनेक कुटुंबे गावाकडे जातात. या काळात चोरटे परिसरावर लक्ष ठेवून संधीची वाट पाहतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरांची आणि सोसायटींची सुरक्षा पक्की करावी.
गावी जाण्याआधी हे करा
गावी जाण्याआधी सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत का, हे तपासावे. सुरक्षारक्षकांना स्पष्ट सूचना द्याव्यात. घरातील मौल्यवान वस्तू, दागिने, रोख रक्कम घरात न ठेवता बँकेच्या लॉकरमध्ये किंवा इतर सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. तसेच दोन किंवा चारचाकी वाहने सुरक्षित ठिकाणी लॉक करून पार्क करावीत.
advertisement
पोलिसांनी गस्त वाढवली
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाघोली पोलिसांनी गस्त पथकांची संख्या वाढवली आहे. हांडे यांनी सांगितले की, सध्या रात्रीच्या गस्तीसाठी तीन अतिरिक्त पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांकडून वसाहती, मुख्य रस्ते, बंद दुकाने आणि परिसरांवर लक्ष ठेवले जात आहे.
दुकानदारांना सूचना
पोलिसांनी व्यापारी आणि दुकानदारांनाही विशेष सूचना दिल्या आहेत. त्यांनी दुकाने बंद करताना कॅश ड्रॉवर रिकामा ठेवावा, सीसीटीव्ही तपासावा आणि सुरक्षा अलार्म कार्यरत आहेत याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
या उपक्रमामुळे सणासुदीच्या काळात वाघोली आणि आसपासच्या परिसरात नागरिकांमध्ये सुरक्षा जनजागृती वाढली असून, पोलिसांच्या तत्परतेमुळे चोरट्यांच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण मिळण्याची अपेक्षा आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 19, 2025 8:38 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो घराला कुलूप लावा अन् बिनधास्त गावी जा; दिवाळीत पुणे पोलिसांचा मोठा निर्णय