Pune Police Recruitment: पुणे पोलीस दलामध्ये भरतीची मोठी अपडेट, या दिवसापासून होणार चाचणी परिक्षा!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
पोलीस भरती उमेदवार रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच होणार आहे. यासाठी चाचणी परिक्षाणही घेतली जाईल. कोणत्या पदासाठी किती जागा आणि परिक्षा कधी घेतली जाणार याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
चंद्रकांत फुंदे, पुणे: पोलीस भरती उमेदवार रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच होणार आहे. यासाठी चाचणी परिक्षाणही घेतली जाईल. कोणत्या पदासाठी किती जागा आणि परिक्षा कधी घेतली जाणार याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई यांच्यासाठी 448 पदे आणि चालक पोलीस शिपाई यांची 48 रिक्त पदे भरणार आहेत. पोलीस शिपाई चालक या पदासाठी मैदानी चाचणी परिक्षा दिनांक 19/06/2024 ते 28/06/2024 या कालावधीत घेण्यात येणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थापनेवर पालीस शिपाई चालक या पदासाठी एकूण 5314 उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले आहेत, तसेच पोलीस शिपाई पदासाठी एकूण 42403 उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.
advertisement
पोलीस शिपाई भरती प्रक्रीयेमध्ये मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी आरएफआयडी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, त्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी परिक्षा ही पारदर्शक व अचुक निर्णय होण्यासाठी मदत होणार आहे.
पोलीस भरतीमध्ये उमेदवारांनी विविध पदांकरिता (पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, बँडसमन, तुरुंगविभाग शिपाई) एका घटकात किंवा वेगवेगळया घटकांत अर्ज करता येतात. त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी किंवा लागोपाठचे दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणीसाठी हजर रहावं लागू शकतं. त्यामुळे काही उमेदवारांची गैरसोय होवू शकते. म्हणून सर्व घटक प्रमुखांना अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांनी खालीलप्रमाणे सुचना दिलेल्या आहेत.
advertisement
1. जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होवू शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल.
2. काही उमेदवारांना वेगवेगळया पदांकरिता एका पेक्षा जास्त ठिकाणी आणि एकच दिवशी मैदानी चाचणी करीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली असेल अश्या उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल.
3. काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर केले जाईल.
advertisement
4. पोलीस भरती 2022-023 मध्ये एकापेक्षा जास्त पदाकरीता अर्ज केले आहेत आणि ज्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल तर अशा उमेदवारांना किमान ४ दिवस अंतराने वेगवेगळया तारखा दिल्या जातील. याबाबत उमेदवारांना अडचण किंवा शंका असल्यास त्यांनी raunak.saraf@mahait.org यावर ईमेल करावा. मात्र या करीता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुस-या मैदानी चाचणीवेळी सादर करावे लागतील.
advertisement
5. उमेदवारांनी कोणत्याही आमीषास बळी पडु नये. याबाबत काही गैरप्रकार आढळून आल्यास थेट पोलीस अधीक्षक यांचेशी संपर्क साधू शकतात.
दरम्यान, बीड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेले 170 पदे भरती प्रक्रियेला 19 जून पासून सुरुवात होणार आहे. बीड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेले 170 पदे भरण्यासाठी भरती प्रकिया 19 जून 2024 पासून सूरु होणारं आहे.
advertisement
बीड शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ही प्रक्रिया पार पडेल. या भरतीमध्ये पोलीस शिपायांची 164 पदे भरली जाणार असून पोलीस शिपाई चालक पदाची 5 तर पोलीस शिपाई बँड्समॅन हे 1 पद भरले जाणार आहे.या भरतीसाठी पोलीस शिपाई पदांसाठी 7 हजार 545, चालक पोलीस शिपाई पदासाठी 693 तर पोलीस शिपाई बँड्समन पदासाठी 191 आवेदन अर्ज प्राप्त झाले आहेत.
advertisement
येत्या बुधवार 19 जूनपासून सर्व पदांच्या मैदानी चाचणीचे वेळापत्रकही जाहीर होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 17, 2024 4:26 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Police Recruitment: पुणे पोलीस दलामध्ये भरतीची मोठी अपडेट, या दिवसापासून होणार चाचणी परिक्षा!


