Pune-Satara Highway: पुणे-सातारा प्रवाशांसाठी खुशखबर! 'सुपरफास्ट' बोगदा खुला, प्रवासाचा वेळ 75 टक्क्यांनी घटला
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
नवीन दुहेरी बोगद्यांपैकी साताऱ्याहून पुण्याकडे येणारा एक बोगदा शनिवारपासून हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ चक्क ३५ मिनिटांनी वाचणार आहे.
पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील प्रवासाचा मोठा अडथळा असलेला खंबाटकी घाटातील धोकादायक प्रवास आता सुसह्य होणार आहे. घाटातील 'एस' (S) आकाराच्या वळणांना पर्याय म्हणून उभारण्यात आलेल्या नवीन दुहेरी बोगद्यांपैकी साताऱ्याहून पुण्याकडे येणारा एक बोगदा शनिवारपासून प्रायोगिक तत्त्वावर हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ चक्क ३५ मिनिटांनी वाचणार आहे.
प्रवासातील महत्त्वाचे बदल:
वेळेची बचत: खंबाटकी घाट ओलांडण्यासाठी पूर्वी ४५ मिनिटे लागायची, ती आता केवळ १० मिनिटांवर येणार आहेत.
अद्ययावत बोगदा: हा बोगदा सुमारे १.३ किमी लांबीचा असून तो तीन पदरी आहे. यामुळे घाटातील तीव्र उतार आणि धोकादायक वळणांपासून प्रवाशांची सुटका होणार आहे.
दरी पुलाचे काम: बोगद्याच्या उताराला असलेल्या दरी पुलाचे काम अद्याप १५ टक्के बाकी आहे. त्यामुळे सध्या फक्त हलक्या वाहनांना प्रवेश दिला जात आहे.
advertisement
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फेब्रुवारी २०१९ मध्ये या ६.४६ किमी लांबीच्या नवीन रस्त्याला मंजुरी दिली होती. कोरोना काळामुळे रखडलेले हे काम आता ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामध्ये प्रत्येकी तीन पदरी दोन बोगदे आणि व्हायाडक्टचा समावेश आहे. मार्च २०२६ पर्यंत संपूर्ण प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
advertisement
घाटातील वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः शनिवार-रविवार होणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीतून आता प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 10:12 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune-Satara Highway: पुणे-सातारा प्रवाशांसाठी खुशखबर! 'सुपरफास्ट' बोगदा खुला, प्रवासाचा वेळ 75 टक्क्यांनी घटला






