पुणेकरांनी साजरा केला लाडक्या 'क्वीन'चा Birthday, 95 वर्षांची झाली दख्खनची राणी'
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
पुणे रेल्वे स्थानकात डेक्कन क्वीनचा 95 वा वाढदिवस सोहळा पार पडला. पुणेकरांनी केक कापून आपल्या लाडक्या क्वीनचा वाढदिवस साजरा केला.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे: भारतातील पहिली डिलक्स ट्रेन डेक्कन क्वीनला 95 वर्षे पूर्ण झाली आहेत. दररोज पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी डेक्कन क्वीन ही महत्वाची गाडी आहे. 1 जून 1930 रोजी सुरू झालेल्या डेक्कन क्वीनचा यंदा 95 वा वाढदिवस झाला. पुणे रेल्वे स्थानकात डेक्कन क्वीनचा वाढदिवस सोहळा पार पडला. पुणेकरांनी केक कापून आपल्या लाडक्या क्वीनचा वाढदिवस साजरा केला.
advertisement
कधी सुरू झाली डेक्कन क्वीन?
पुणे आणि मुंबई या दोन प्रमुख शहरांना जोडणारी डेक्कन क्वीन ही गाडी 1 जून 1930 रोजी सुरू झाली होती. मध्य रेल्वेचा अग्रदूत असलेल्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता. या प्रदेशातील 2 महत्त्वाच्या शहरांना सेवा देण्यासाठी बनवण्यात आलेली ही पहिली डिलक्स ट्रेन होती. तिला पुण्याचे नाव देण्यात आले होते, ज्याला ‘दख्खनची राणी’असेही म्हटले जाते.
advertisement
कशी होती पहिली गाडी?
सुरुवातीला ही रेल्वे प्रत्येकी 7 डब्यांच्या 2 रेकसह चालवण्यात आली होती. ज्यापैकी एक स्कार्लेट मोल्डिंगसह चंदेरी आणि दुसरी सोनेरी रेषांसह रॉयल ब्लू रंगाने रंगवलेला होता. मूळ रेकच्या डब्यांच्या अंडर फ्रेम्सची इंग्लंडमध्ये बांधणी करण्यात आली होती. तर कोचच्या बॉडी जीआयपी रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये तयार करण्यात आली होती.
advertisement
काय आहे डेक्कन क्वीनचे वैशिष्ट्य?
या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही भारतातील एकमेव अशी गाडी आहे ज्यात डायनिंग कार आहे. म्हणजेच चालत्या गाडीत हॉटेलसारखे बसून खाण्याची सोय आहे. डेक्कन क्वीनला दख्खनची राणी असे देखील मराठीत संबोधले जाते. या राणीचा दिमाख आणि रुबाब काही असा होता की, पुणे स्टेशनवरून सकाळी 7.15 वाजता निघालेली ही रेल्वे 10 वाजून 20 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचत असे. ही रेल्वे धावायला लागली की, अन्य गाड्या बाजूला उभ्या केल्या जात होत्या असं प्रवाश्यांनी म्हटलंय.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
June 02, 2024 2:41 PM IST