Sinhagad Traffic: सिंहगड किल्ल्यावरील वाहतूक बंद, कारण काय? पर्यायी मार्ग कोणते?

Last Updated:

Sinhagad Traffic: पुण्यातील सिंहगड घाटमार्गावरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. तसेच सिंहगडावरील वाहतूक देखील बंद राहणार आहे.

Sinhagad Traffic: सिंहगड किल्ल्यावरील वाहतूक बंद, कारण काय? पर्यायी मार्ग कोणते?
Sinhagad Traffic: सिंहगड किल्ल्यावरील वाहतूक बंद, कारण काय? पर्यायी मार्ग कोणते?
पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ला नेहमीच पर्यटकांचे आकर्षण केंद्र राहिला आहे. परंतु, पुढील 3 दिवस किल्ल्यावर जाण्याचा प्लॅन करत असाल तर नियोजन बदलावं लागणार आहे. या किल्ल्यावरील वाहतूक 24 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या काळात बंद राहणार आहे. तसेच सिंहगड घाटमार्गावरील वाहतुकीत देखील बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी जाणाऱ्यांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.
जानेवारी 2026 मध्ये पुण्यात पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 ही सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत अनेक देशांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. स्पर्धेच्या मार्गावरील रस्ते डांबरीकरण, चेंबर दुरुस्ती, पादचारी मार्ग दुरुस्ती यासह अन्य सुधारणांसाठी महापालिकेच्या वतीने 145 कोटी 75 लाख 80 हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
advertisement
तीन दिवस रस्ता पूर्ण बंद
सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत डोणजे गोळेवाडी टोलनाका ते सिंहगड घाटातील कोंढणपूर टोलनाका आणि अवसरेवाडीच्या दिशेने जाणारा रस्ता बंद राहणार आहे. या कालावधीत रस्त्यावर डांबरीकरणाचे काम होणार असल्याने, वाहनधारकांनी पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी येणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यटकांना आतकरवाडी पायी मार्गाने किल्ल्यावर जाता येणार आहे.
advertisement
पर्यायी मार्ग कोणते आहेत?
पानशेत, खानापूर, डोणजे आणि आतकरवाडी मार्गे सिंहगड घाटमार्गाने खेड-शिवापूरकडे जाणारी वाहतूक आता डोणजे चौकापासून खडकवासला, किरकटवाडी, नांदेडसिटी आणि वडगाव धायरी मार्गे पुणे-बंगळुरू महामार्गावर वळवण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, गोळेवाडी चौक ते सिंहगड पाट (कोंढणपूर बाजूकडून) या मार्गावर वाहनांना जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.
दरम्यान, सायकल स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी हा बदल आवश्यक आहे. नागरिकांनी आणि वाहनचालकांनी या काळात पर्यायी मार्ग वापरून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Sinhagad Traffic: सिंहगड किल्ल्यावरील वाहतूक बंद, कारण काय? पर्यायी मार्ग कोणते?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement