कॉर्पोरेट नोकरी सोडली! हिमाचल प्रदेशातून 400 रोपे आणली, आता शिर्डीचे विक्रांत काळे करताय लाखोंची उलाढाल
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : सफरचंद म्हटले की सहसा डोळ्यांसमोर हिमाचल प्रदेशातील किन्नौरच्या थंड हवेतील हिरव्यागार बागा उभ्या राहतात. शेतकरी पाठीवर टोपल्या घेऊन रसाळ सफरचंद तोडत असतात.
मुंबई : सफरचंद म्हटले की सहसा डोळ्यांसमोर हिमाचल प्रदेशातील किन्नौरच्या थंड हवेतील हिरव्यागार बागा उभ्या राहतात. शेतकरी पाठीवर टोपल्या घेऊन रसाळ सफरचंद तोडत असतात. अशी कल्पना प्रत्येकाच्या मनात येते. मात्र आता हे चित्र बदलताना दिसतंय. हिमाचलमध्ये पिकणारे हे फळ महाराष्ट्राच्या उष्ण वातावरणातही उत्तम रित्या पिकत आहे. आणि हे करून दाखवलं आहे ते शिर्डीजवळील वाकडी येथील इंजिनीअर तरुण शेतकरी विक्रांत काळे यांनी. जाणून घेऊ त्यांची प्रेरणादायी यशोगाथा
कॉर्पोरेट जगातून पडले बाहेर
विक्रांत यांनी वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून माहिती तंत्रज्ञानात अभियांत्रिकी पूर्ण करून त्यांनी बीसीसीआय आणि इंडियन सुपर लीगसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम केले. पुणे, डेहराडून आणि गुवाहाटी येथील क्रीडा पायाभूत सुविधांच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिले.
2017 ला घेतला मोठा निर्णय
प्रगती होत असतानाही नोकरी करत आयुष्य घालवणे विक्रांत यांच्या मनाला पटले नाही.2017 मध्ये त्यांनी मोठा निर्णय घेतला आणि त्यांच्या मुळांशी शेतीकडे परतण्याचा मार्ग स्वीकारला. 35 वर्षे रोपवाटिका आणि बागायती व्यवसायात असलेल्या कुटुंबाच्या अनुभवाचा आधार घेत विक्रांत यांनी शेतीत नव नवीन प्रयोग सुरू केला.
advertisement
2 महीने प्रशिक्षण घेतले
विक्रांत यांची सर्वात मोठी झेप ठरली ती म्हणजे सफरचंद शेती. हिमाचल प्रदेशातील सफरचंद लागवडीच्या पद्धती समजून घेण्यासाठी त्यांनी दोन महिने प्रत्यक्ष तिथे प्रशिक्षण घेतले. नंतर स्थानिक हवामानानुसार त्या पद्धतीत आवश्यक बदल करत प्रयोग सुरू केले.
पुढे जाऊन 2019 मध्ये त्यांनी इस्रायलमधील ‘अना’ जातीची 400 रोपे आणली. ही जात उष्ण हवामान सहन करू शकते आणि गोड चव तसेच पिवळसर रंगासाठी प्रसिद्ध आहे. सफरचंदांच्या ओळींमधील जागेत त्यांनी सुरुवातीला कांदा आणि सोयाबीनसारखी पिके घेऊन मातीचा समतोल आणि उत्पन्न टिकवून ठेवला. तीन वर्षांनी त्यांनी त्यांच्या शेतीतील पहिले फळ पाहिले. आज त्यांच्या प्रत्येक झाडाला 30 ते 40 किलो फळे लागतात हिमाचलमधील उत्पादनाइतकीच गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता त्यांना मिळत आहे.
advertisement
उष्ण वतावरणात पिकवली बाग
महाराष्ट्रात बहुतांश भाग हा उष्णकटीबंध आहे. अशात सफरचंद शेतीसाठी थंड वातावरणाची गरज असते. मात्र विक्रांत काळे यांनी आपल्या अतिशय नियोजनबद्ध उष्ण वातावरणात सफरचंदाची भाग फुलवली आहे. विक्रांत यांनी आज महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये त्यांच्या सफरचंदांसाठी बाजारपेठ शोधली आहे. केवळ दोन एकरावर केलेल्या सफरचंद लागवडीमधून त्यांना प्रति एकर 16,000 किलोग्रॅम उत्पादन मिळते आणि यातून दरवर्षी 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न मिळते.
advertisement
विदेशी पिकांचा प्रयोग
view commentsसफरचंद शेतीच्या यशानंतर विक्रांत थांबले नाहीत. 40 एकर क्षेत्रात त्यांनी पांढरा जांभूळ, एवोकॅडो, गुलाबी नारळ आणि अन्य विदेशी पिकांची लागवड सुरू केली आहे. यामुळे शाश्वत आणि विविधतेने भरलेले आधुनिक शेती मॉडेल उभे राहिले आहे.आज ते यातून लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2025 7:41 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
कॉर्पोरेट नोकरी सोडली! हिमाचल प्रदेशातून 400 रोपे आणली, आता शिर्डीचे विक्रांत काळे करताय लाखोंची उलाढाल


