Smriti Mandhana : संगीत समारंभात सलमान खानच्या गाण्यावर थिरकले स्मृती अन् पलाश, Inside व्हिडीओ समोर

Last Updated:

Smriti Mandhana Wedding Dance Video : टीम इंडियाची नॅशनल क्रश स्मृती मानधना आज विवाहबंधनात अडकणार आहे. पलाश मुच्छलसोबत तिचं आज लग्न आहे. अशातच काल रंगारंग संगीत समारंभ पार पडला.

Smriti Mandhana Wedding Dance Video
Smriti Mandhana Wedding Dance Video
Smriti Mandhana Dance Video : सध्या सोशल मीडियावर भारतीय क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीत क्षेत्रातील कलाकार पलाश मुच्छल यांच्या एका मोठ्या सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून, त्यावर नेटिझन्सकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. हळदीपासून ते संगीताच्या कार्यक्रमापर्यंत प्रत्येक विधीचे व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहेत. अशातच पलाश आणि स्मृतीचा रोमांटिक डान्स ट्रेडिंगवर आहे.

सलमानच्या गाण्यावर थिरकली स्मृती

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या संगीत सेरेमनीचा एक व्हिडिओ सध्या विशेष लक्ष वेधून घेत आहे, ज्यामध्ये ही जोडी सलमान खानच्या 'तेनु ले के मैं जावांगा' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. व्हायरल क्लिपमध्ये स्मृती हातात हार घेऊन येते आणि पलाशच्या गळ्यात घालते, त्यानंतर दोघांनी जबरदस्त डान्स केला. चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच आवडला असून, अनेकांनी यावर मजेशीर आणि प्रेमळ प्रतिक्रिया दिल्या आहेत.
advertisement

'तेरा यार हूं मैं' गाण्यावर ग्रुप डान्स

या संगीत कार्यक्रमात केवळ नवरदेव आणि नवरीनेच नाही, तर संपूर्ण भारतीय महिला क्रिकेट टीमनेही खास परफॉर्मन्स दिला. स्मृतीसाठी तिच्या संघसहकाऱ्यांनी 'तेरा यार हूं मैं' या गाण्यावर ग्रुप डान्स केला. आपल्या सहकारी खेळाडूसाठी टीमने दिलेले हे 'इमोशनल' ट्रिब्यूट उपस्थितांचे मन जिंकणारे ठरले. हा व्हिडिओ पाहून दोघींमधील मैत्री आणि संघातील बॉन्डिंग स्पष्टपणे दिसून येत आहे.
advertisement

स्मृती जांभळ्या रंगाच्या पारंपरिक वेशभूषेत

मेंहदी सेरेमनीचेही काही खास फोटो समोर आले आहेत, ज्यात स्मृती जांभळ्या रंगाच्या पारंपरिक वेशभूषेत अतिशय सुंदर दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत टीम इंडियाच्या इतरही अनेक प्लेयर उपस्थित होत्या. दुसरीकडे, पलाशने क्रीम रंगाचा कुर्ता आणि नक्षीकाम केलेले जॅकेट परिधान केले होते. या सोहळ्यात नवदांपत्याचे जवळचे मित्र आणि कुटुंबीयांसह गायिका पलक मुच्छल आणि संगीतकार मिथुन यांनीही हजेरी लावली होती.
advertisement

क्रिकेटपटू बेधूंद नाचल्या

दरम्यान, लग्नापूर्वीच्या विधींमध्ये हळदी समारंभाचीही चांगलीच रंगत पाहायला मिळाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पलाश फुलांच्या पाकळ्यांच्या वर्षावात जोशात नाचताना दिसत आहे. या सेलिब्रेशनमध्ये क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्सही सहभागी झाली होती, ज्यामुळे वातावरणात अधिकच उत्साह निर्माण झाला. स्मृती देखील आपल्या 'टीममेट्स' सोबत आनंदाने थिरकताना दिसून आली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : संगीत समारंभात सलमान खानच्या गाण्यावर थिरकले स्मृती अन् पलाश, Inside व्हिडीओ समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement