pune flood : महिना उलटूनही पुण्यातील पूरग्रस्तांना खरंच मदत मिळाली का?, Ground report, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
अजून पर्यंत एक रुपये देखील मदत जी आहे ती मिळाली नाही आणि पेपर मध्ये देण्यात आलं आहे की दहा हजार रुपये मदत दिली जाणार आहे परंतु दहा हजार रुपये मध्ये काही होत नाही. आमचे लाखोनी नुकसान झाले आहे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाचा पुन्हा जोर पाहायला मिळत आहे. गेल्या 2 दिवसांपासून पुणे शहरात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पुण्यात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
मागील महिन्यात घडलेल्या या घटनेनंतर पुण्यातील सिंहगड परिसरातील एकता नगरची सर्वत्र चर्चा झाली होती. या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले होते. याठिकाणी सैन्यदलासह एनडीआरएफच्या टीमलाही बोलवण्यात आले होते. पावसामध्ये येथील स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक वर्षाचे संसार एका पावसामुळे मोडकळीच निघाले.
advertisement
स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने प्रशासनाच्या वतीने येथील घटनेचा पंचनामेही करण्यात आले. मात्र, खरंच या लोकांना मदत मिळाली का, त्यांच्या मागण्या काय आहेत, याचबाबत लोकल18 चा विशेष आढावा.
लोकल18 च्या पाहणीत असे समोर आले की, अजून पर्यंत एक रुपयेदेखील मदत या लोकांना मिळाली नाही. वर्तमानपत्रात देण्यात आले आहे की, या लोकांना 10 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. मात्र, 10 हजार रुपये मध्ये काही होत नाही. आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पाणी आले तेव्हाही काही मदत मिळाली नाही सगळे जण पाणी उतरल्यानंतर येऊन गेले. तेव्हा देखील काही दिले नाही. आतापर्यंत आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही, असे येथील स्थानिकांनी सांगितले.
advertisement
गुजरातच्या गवतामुळे वाढले दुधाचे उत्पन्न, सोलापूरचा शेतकरी कमावतोय महिन्याला दीड लाख रुपये, VIDEO
view commentsतसेच प्रशासनाने जर पाणी सोडणार आहे, असे वेळीच सांगितले असते, तर आमच्यावर ही वेळ आली नसती. ही सर्व परिस्थिती निर्माण झाली, या घटनेला आता जवळपास एक महिना होऊन गेला आहे. अजूनही आम्ही एक एक गोष्ट उभी करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने ते भरून देखील काढू शकत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नुकसान भरपाई ही लवकरात लवकर मिळावी, अशा भावना येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 27, 2024 3:43 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
pune flood : महिना उलटूनही पुण्यातील पूरग्रस्तांना खरंच मदत मिळाली का?, Ground report, VIDEO

