Pimpri Crime : धक्कादायक! मुलीला न विचारता दवाखान्यात घेऊन गेली, संतापलेल्या पतीने पत्नीसोबत जे केलं ते पाहून सर्व हादरले
Last Updated:
Pimpri Crime : पिंपरीतून अतिशय वेगळीपण तितकीच धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथे अतिशय शुल्लक कारणांमुळे पतीने पत्नीस मारहाण केलेली आहे. नेमके काय घडले ते सविस्तर जाणून घेऊयात.
पिंपरी : पिंपरीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नीने मुलीला डॉक्टरकडे नेताना पतीला न सांगितल्यामुळे संतापलेल्या पतीने तिच्यावर हल्ला केला. आकुर्डी परिसरात शुक्रवारी (दि. 7) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर संजय साबळे ( वय23)आणि प्रियंका मयूर साबळे (वय 25)हे दोघही आपल्या मुलीसह आकुर्डी परिसरात वास्तव्यास आहेत. शुक्रवार संध्याकाळी प्रियंकाही आपल्या मुलीला दवाखान्यात घेऊन गेली होती. मात्र काही वेळाने मयूर सोसायटीत आला आणि प्रियंकाला ''मुलीला मला न विचारता दवाखान्यात का घेऊन गेली'' अस विचारत संतापला आणि रागाच्या भरात त्याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर तिचे डोके पार्किंगमधील कॉलमवर आपटून गंभीर जखमी केले.
advertisement
घडलेला सर्व प्रकाराने सर्व हादरेल आणि तात्काळ हा प्रकार पोलिसांना कळवण्यात आला असून प्रियंकाने निगडी पोलिस ठाण्यात नवऱ्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून मयूर साबळेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2025 10:24 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pimpri Crime : धक्कादायक! मुलीला न विचारता दवाखान्यात घेऊन गेली, संतापलेल्या पतीने पत्नीसोबत जे केलं ते पाहून सर्व हादरले


