हिंजवडी IT पार्कमध्ये पुण्यातला सर्वात मोठा घोटाळा, रातोरात गुंतवणूकदार कंगाल, 23 जणांवर गुन्हा दाखल
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Pune: पुण्यातील बाणेर-हिंजवडी आयटी पार्क परिसरात एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. टी डब्ल्यू डे नावाच्या कंपन्यांच्या जाळ्यात अडकून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे.
पुण्यातील बाणेर-हिंजवडी आयटी पार्क परिसरात एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. टी डब्ल्यू डे नावाच्या कंपन्यांच्या जाळ्यात अडकून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी कंपनीचे संचालक आणि व्यवस्थापकांसह एकूण २३ जणांविरोधात वारजे-माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोटाळ्याचा सूत्रधार नार्वेकर दाम्पत्य
या संपूर्ण घोटाळ्याचा सूत्रधार समीर नार्वेकर आणि त्यांची पत्नी नेहा नार्वेकर असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या दाम्पत्यासोबत अनेक कंपन्यांचे डायरेक्टर व मॅनेजर या फसवणुकीत सहभागी आहेत. प्रार्थना प्रथमेश मशीलकर (वय २८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका घोटाळा काय आहे?
फसवणूक करणाऱ्या आरोपींनी सुरुवातीला 'लर्निंग सोल्युशन्स' नावाच्या क्लासमार्फत शेअर ट्रेडिंगचे प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने गुंतवणूकदारांना त्यांच्या नेटवर्कमध्ये सामील केले. त्यानंतर टी डब्ल्यू डे इव्हेंट्स आणि इतर काही बनावट कंपन्यांकडून आकर्षक गुंतवणुकीचे प्रस्ताव देण्यात आले. यामध्ये, १० लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ३ टक्के मासिक परतावा, १० लाखांवर ४ टक्के, तर २५ लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ५ टक्के मासिक परतावा देण्याचे आश्वासन दिले गेले.
advertisement
सुरुवातीच्या काही महिन्यांत गुंतवणूकदारांना वेळेवर परतावा मिळाल्याने त्यांचा कंपनीवर विश्वास बसला. यामुळे अनेकांनी बँका आणि इतर ठिकाणांहून कर्ज काढून मोठी रक्कम गुंतवली. फिर्यादी प्रार्थना मशीलकर यांनीही कर्ज घेऊन तब्बल ३२ लाख रुपये गुंतवले होते. मार्च २०२५ पर्यंत त्यांना वेळोवेळी गुंतवणुकीचा परतावा देण्यात आला. मात्र त्यानंतर अचानक सर्वांचे पेमेंट बंद झाले. आयकर विभागाची प्रक्रिया सुरू आहे किंवा परदेशी गुंतवणूक येणार आहे, अशी कारणं देत कंपनीने वेळ मारून नेली.
advertisement
दहा कंपन्यांच्या नावाखाली पैसे गोळा केला
नार्वेकर दाम्पत्याने टी डब्ल्यू डे इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, लर्निंग सोल्युशन्स, आयटी सोल्युशन्स, इन्फ्रास्ट्रक्चर, मीडिया अशा दहाहून अधिक वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून पैसे गुंतवून घेतले. या सर्व कंपन्यांचे नियंत्रण नार्वेकर दाम्पत्याकडेच होते. काही गुंतवणूकदारांनी १० लाख, काहींनी २५ ते ५० लाख, तर एका गुंतवणूकदाराने तब्बल २.८३ कोटी रुपये गुंतवले होते. बहुतांश गुंतवणूकदारांनी कर्ज घेऊन ही गुंतवणूक केल्यामुळे, आता कर्जाचे हप्ते फेडणे त्यांना अशक्य झाले आहे. अनेक गुंतवणूकदारांवर बँकांनी वसुलीची प्रक्रिया सुरू केली आहे.
advertisement
२३ जणांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी समीर व नेहा नार्वेकर यांच्यासह एकूण २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या सर्व आरोपींवर बेकायदा ठेवी योजना (प्रतिबंध) अधिनियम २०१९ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. या घोटाळ्याची चौकशी आता आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 05, 2025 12:58 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
हिंजवडी IT पार्कमध्ये पुण्यातला सर्वात मोठा घोटाळा, रातोरात गुंतवणूकदार कंगाल, 23 जणांवर गुन्हा दाखल