Pune : मित्राच्या घरी पतंग उडवण्यासाठी गेले अन् अल्पवयीन मुलांनी केलं नको ते कृत्य; अखेर सापडले पोलिसांच्या तावडीत

Last Updated:

Pune Shocking Crime News: पुणे शहरातून चोरीच्या घटना नेहमी येत असतात. मात्र सध्या समोर आलेली घटना पाहून प्रत्येकजण डोक्याला हात मारत आहे. नेमके घडले काय ते एकदा सविस्तर जाणून घेऊयात.

News18
News18
पुणे : पुण्याच्या रविवार पेठेतून एकदम भन्नाट किस्सा समोर आला आहे. मित्राच्या घरात पतंग उडवायला गेलेले दोन अल्पवयीन मुलं अचानक सुपरहिरो मोडमध्ये गेले. पतंग खेळताना गेल्यानंतर मित्राच्या घरातील कपाटात पाच लाख रुपये दिसले. मग त्यांनी ठरवलं, ''थोडं प्लॅन करूया,'' आणि तिथून सुरू झाली चोरीची गोष्ट.
संपूर्ण घटना सविस्तर वाचा
मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटना पुण्यातील रविवार पेठेतील आहे. जिथे राहत असलेला एक अल्पवयीन मुलगा त्याच्या मित्राच्या घरी पतंग उडवण्यासाठी गेला असता मित्राच्या घरातील कपाटात ठेवलेले पैसे लक्षात आले. मग काय त्यानंतर त्याने त्याच्या दुसऱ्या मित्रासोबत एक योजना आखली. आखलेल्या योजनेनुसार त्यांनी घरातील मुलाला पतंग उडविण्याच्या बहाण्याने छतावर नेऊन संधी साधली आणि मग लागोपाठ दोन-तीन दिवसांच्या आत घरातील पाच लाख रुपये लंपास केले.
advertisement
चोरी झाल्यानंतर काही दिवसांनी ते दोघे नवी दुचाकी घेण्यासाठी शोरूममध्ये गेले. मात्र, तिथे दोघही पोलिसांच्या तावडीत सापडले. मात्र गेल्या काही दिवसांपासून घरातील पैसे आणि काही वस्तू गायब असल्याचा संशय  रुममालकाला  आला होता, कारण घरात सतत कोणी ना कोणी कामासाठी येत असायचे आणि घर नेहमी उघडे असायचे. त्यानंतर घर मालकाने तातडीन तुरुंगरोड पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली, ज्यावरून पोलिसांनी संपूर्ण तपास सुरु केला.
advertisement
एक छोटी चूक अन् पोलिसांच्या तावडीत सापडले मुलं
तपासादरम्यान पोलिसांना काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली .मग काय पोलिसांनी सापळा रचून दोन अल्पवयीन मुलांना पकडले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरीची कबुली दिली आणि पोलिसांनी त्यांच्याकडून चार लाख दहा हजार रुपये हस्तगत केले.
पोलिसांच्या माहितीनुसार चोरी झाल्यानंतर या अल्पवयीन मुलांचे वर्तन बदलले होते. त्यांनी मिळून एकाच रंगाचे कपडे आणि शूज खरेदी केले. त्यापैकी एकाने आईसाठी सोन्याचा हार देखील घेतला. दररोज ते मित्र चायनीज आणि बिर्याणी खात होते. आठ दिवसांत त्यांनी दीड ते दोन लाख रुपये सहजपणे खर्च केले. त्यापैकी काही रक्कम त्यांनी गणेशोत्सवात मित्रांना वर्गणी म्हणून दिली.
advertisement
या घटनेमुळे एका अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाचेही लक्ष वेधले गेले. कारण मुलाचे घरातील वर्तन, वीज बिल भरणे आणि अन्य खर्चाबद्दल पूर्वी काही लोकांना खटकत होते. पोलिसांनी सांगितले की या दोघांनी चोरी केलेले पैसे अनावश्यक गोष्टीवरही खर्च करत होते आणि त्यात त्यांनी नवी दुचाकी खरेदी करण्याच्या प्रयत्न केला आणि पोलिसांच्या तावडीत अडकले.
advertisement
पोलिसांनी या प्रकारात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे आणि किशोरवयीन आरोपींवर न्यायालयीन प्रक्रिया लवकरच सुरु होईल. या घटनेमुळे पालक, शिक्षक आणि समाजातील प्रत्येकाने अल्पवयीन मुलांच्या वर्तनाकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट होते.
मराठी बातम्या/पुणे/
Pune : मित्राच्या घरी पतंग उडवण्यासाठी गेले अन् अल्पवयीन मुलांनी केलं नको ते कृत्य; अखेर सापडले पोलिसांच्या तावडीत
Next Article
advertisement
Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement