Pune News : पुण्यातील तरुणांचं मोठं कांड; दरवाजा उघडताच घरातील दृश्य पाहून पोलीसही थक्क
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पोलीस कारवाई करतील या भीतीपोटी त्यांनी घरातच सुरक्षित ठिकाण म्हणून हुक्का पार्लर थाटले होते. विशेष म्हणजे, आरोपी ग्राहक मागतील त्याप्रमाणे ऑनलाइन मागणीनुसार हुक्का पुरवत होते.
पुणे : पुण्यातून एक अजब घटना समोर आली आहे. पुणे शहरात हुक्का पार्लरवर बंदी आहे. अशात कारवाईच्या भीतीने चक्क एका घरामध्ये हुक्का पार्लर चालवण्याचा प्रकार विमाननगर परिसरात उघडकीस आला आहे. विमाननगर पोलिसांनी छापा टाकून या अवैध हुक्का पार्लरचा पर्दाफाश केला असून, ३४ हुक्का पात्रे आणि सुगंधी तंबाखू असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या तिघांना ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांना म्हाडा कॉलनीतील एका सदनिकेत छुप्या पद्धतीने हुक्का पार्लर चालवले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर, पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकला. आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून, त्यांच्याविरुद्ध तंबाखूजन्य उत्पादने अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
तपासात अशी माहिती समोर आली आहे की, आरोपी बाहेर उघडपणे हुक्का पार्लर चालवण्याची हिंमत करत नव्हते. त्यामुळे पोलीस कारवाई करतील या भीतीपोटी त्यांनी घरातच सुरक्षित ठिकाण म्हणून हुक्का पार्लर थाटले होते. विशेष म्हणजे, आरोपी ग्राहक मागतील त्याप्रमाणे ऑनलाइन मागणीनुसार हुक्का पुरवत होते. पोलीस कर्मचारी हरिप्रसाद पुंडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही महत्त्वपूर्ण कारवाई केली.
advertisement
दरम्यान, मुंबईतील कमला मिल परिसरातील एका हॉटेलमध्ये हुक्का पार्लरमुळे आग लागून अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. या गंभीर घटनेची दखल घेऊन राज्य सरकारने हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 01, 2025 12:43 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : पुण्यातील तरुणांचं मोठं कांड; दरवाजा उघडताच घरातील दृश्य पाहून पोलीसही थक्क


