पुन्हा जोरदार! पावसाचा दिवाळीपर्यंत मुक्काम? जाणून घ्या हवामानाचं ताजं अपडेट?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
Weather Forecast: राज्यात दिवाळी जवळ आली तरी परतीच्या पावसाचा मुक्काम कायम आहे. 28 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामान अंदाजाबाबत जाणून घेऊ.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे: राज्यात जोरदार पाऊस झाला त्यानंतर काही भागात पावसाने उसंत घेतली आहे. तर काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक या जिल्ह्यामध्ये उकाडा जाणवत आहे. 28 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामान आणि पावासाचा अंदाज जाणून घेऊ.
मुंबईमध्ये गेल्या 8 ते 10 दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत आहे. मुंबईत सोमवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. शहरातील किमान तापमान 29 अंश सेल्सियस तर कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस असेल. मुंबईमधील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल.
advertisement
पुण्यात काही दिवस वातावरण ढगाळ राहणार असून काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यासह जिल्ह्यात ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळेल. सोमवारी 27 अंश कमाल तर 23 अंश सेल्सियस किमान तापमान असेल.
विदर्भातील नागपूर, अमरावती या शहरात तापमान वाढलेलं असेल. तर चंद्रपूर,भंडारा,वर्धा,अकोला या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर मध्ये 29 अंश सेल्सियस कमाल तर 23 अंश सेल्सियस किमान तापमान असेल.
advertisement
मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, जालना, परभणी या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. छ. संभाजीनगरमध्ये उद्या28 अंश सेल्सियस कमाल 21 अंश सेल्सियस किमान तापमान असेल.
advertisement
राज्यात काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत. तर काही भागात उन्हाचा चटकाही जाणवत आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील पुढील काही दिवस पावसाचा अंदाज असून किमान तापमानातही वाढीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 27, 2024 6:33 PM IST