पश्चिम महाराष्ट्राला उन्हापासून दिलासा, मात्र ढगाळ वातावरण कायम, पाहा आजचं हवामान
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात काहीशी घट झाली आहे. मात्र, ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे : राज्यातील तापमानात मार्चच्या सुरुवातीला घट झालेली दिसून येत आहे. त्याचबरोबर तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण सुद्धा बघायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात देखील घट बघायला मिळत आहे. सोलापूरमधील तापमानात अंशतः घट झाल्याने तेथील नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 2 मार्चला पश्चिम महाराष्ट्रातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल पाहुयात.
पुण्यामध्ये आज 2 मार्चला मुख्यतः निरभ्र आकाश असून तेथील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत पुण्यातील कमाल तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
साताऱ्यातील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. साताऱ्यात आज 2 मार्चला दुपार किंवा सायंकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
सांगलीमध्ये आज 2 मार्चला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. सांगलीतील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. सांगलीतील कमाल तापमानात पुढील काही दिवसांत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
सोलापूरमध्ये आज मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. सोलापूरमधील कमाल तापमानात काहीशी घट झालेली दिसून येत आहे. तेथील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत सोलापुरातील तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोल्हापूरमधील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये आज दुपार किंवा सायंकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील तुरळक जिल्ह्यांत ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्याचबरोबर आज 2 मार्चला बहुतांश जिल्ह्यांतील तापमानात घट झाली आहे. मात्र, पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असल्यानं नागरिकांना चांगलाच उकाडा सहन करावा लागणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
March 02, 2025 7:12 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पश्चिम महाराष्ट्राला उन्हापासून दिलासा, मात्र ढगाळ वातावरण कायम, पाहा आजचं हवामान