Mumbai Real Estate: मुंबईतील ऑफिसेस सर्वात महाग, तीन वर्षांत 28 टक्क्यांनी वाढलं भाडं
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Mumbai Real Estate: मुंबईमध्ये कंपन्या प्रामुख्याने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, लोअर परळ, अंधेरी पूर्व यांसारख्या विकसित परिसरांना पसंती देत आहेत.
मुंबई : आपल्या देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई हे शहर राहण्यासाठी दिवसेंदिवस अधिक महाग होत असल्याचं चित्र आहे. गेल्या तीन वर्षांत मुंबईतील घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुंबईतील घरं तर महाग झालीच आहेत त्यासोबत ऑफिसच्या जागा देखील महागल्या आहेत. मुंबईतील कार्यालयांच्या किमतीमध्ये गेल्या तीन वर्षांत सरासरी 28 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे देशातील प्रमुख शहरांमध्ये मुंबईतील कार्यालये ही देशातील सर्वात महाग कार्यालये ठरली आहेत. रिअल इस्टेटचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षण कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.
मुंबईनंतर कार्यालयांच्या भाड्याच्या बाबतीत दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर असून तिसऱ्या क्रमांकावर हैदराबाद, चौथ्या क्रमांकावर बंगळुरू, पाचव्या क्रमांकावर पुणे तर सहाव्या क्रमांकावर चेन्नई हे शहर आहे. या सर्वेक्षणानुसार, 2012 मध्ये मुंबईतील ऑफिस भाड्याचे सरासरी दर प्रति चौरस फूट 131 रुपये होते. 2025मध्ये हे दर प्रति चौरस फूट 168 रुपयांपर्यंत वाढले आहेत. कोरोना महामारीनंतर पुन्हा कंपन्यांनी ऑफिसमधून काम करण्यास प्राधान्य दिल्यामुळे ऑफिसच्या भाड्यांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
मुंबईमध्ये कंपन्या प्रामुख्याने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, लोअर परळ, अंधेरी पूर्व यांसारख्या विकसित परिसरांना पसंती देत आहेत. या परिसरांमध्ये वित्तीय सेवा संस्था, माहिती तंत्रज्ञान, औषध निर्मिती, माध्यम कंपन्या, मनोरंजन कंपन्या, वाहन कंपन्यांचे ऑफिस आहेत.
बॉलिवुड कलाकारांची गुंतवणूक वाढली
बॉलिवुड कलाकार मोठ्या प्रमाणात व्यावसायिक अथवा कार्यालयीन मालमत्तांची खरेदी करत आहेत. गेल्या दोन वर्षांत कलाकारांनी मुंबईतील रिअल इस्टेटमध्ये 550 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. त्यापैकी 60 टक्के गुंतवणूक ही कार्यालयीन मालमत्तेमध्ये केली आहे. या कलाकारांनी आपल्या मालमत्ता खासगी कंपन्यांना भाड्याने दिल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 16, 2025 10:17 AM IST
मराठी बातम्या/रिअल इस्टेट/
Mumbai Real Estate: मुंबईतील ऑफिसेस सर्वात महाग, तीन वर्षांत 28 टक्क्यांनी वाढलं भाडं