Akshaya Tritiya 2024 : थांबा! अक्षय्य तृतीया म्हणून चुकूनही सोनं खरेदी करू नका; तज्ज्ञांनी सांगितलं कारण
- Published by:Priya Lad
Last Updated:
Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया म्हणून बरेच जण सोनं किंवा इतर काही वस्तू खरेदी करण्याच्या तयारीत असतील. तुम्ही तेच करणार असाल तर थांबा. अक्षय तृतीया म्हणून आज चुकूनही सोनं खरेदी करू नका, असा सल्ला ज्योतिष तज्ज्ञांनी दिला आहे.
नवी दिल्ली : आज अक्षय्य तृतीया, साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त. आजच्या दिवशी सोनं किंवा आणखी इतर काही वस्तू खरेदी करणं, तसंच काही शुभ कार्य करणं चांगलं मानलं जातं. त्यामुळे आज बरेच जण सोनं किंवा इतर काही वस्तू खरेदी करण्याच्या तयारीत असतील. तुम्ही तेच करणार असाल तर थांबा. अक्षय तृतीया म्हणून आज चुकूनही सोनं खरेदी करू नका, असा सल्ला ज्योतिष तज्ज्ञांनी दिला आहे.
आजवर अक्षय्य तृतीयेला तुम्ही सोनं घेतलं असेल. पण यंदाची अक्षय्य तृतीयेला सोनं बिलकुल खरेदी करू नका. आता याचं कारण काय ते एका ज्योतिष तज्ज्ञांनी सांगितलं आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
काय आहे कारण?
ज्योतिषानं दिलेल्या माहितीनुसार दागिन्यांचं प्रतिनिधीत्व करतो तो गुरू आणि शुक्र ग्रह. तर गुरू ग्रह सोन्याचं प्रतिनिधीत्व करतो. या वर्षी गुरू आणि शुक्र दोन्ही ग्रहांवर सूर्याचा परिणाम होणार आहे. जेव्हा कोणताही ग्रह सूर्याजवळ येतो तेव्हा तो त्याचं वैशिष्ट्य किंवा त्याची शक्ती गमावतो. सूर्य हा ग्रहांचा राजा आणि त्याच्याजवळ जे काही येतं, त्या प्रत्येकावर त्याची आग आणि तेजाचा परिणाम होतो. आज अक्षय्य तृतीयेला गुरू आणि शुक्र सूर्याच्या जवळ आहेत, त्यामुळे या अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करू नका.
advertisement
फक्त सोनंच नव्हे तर या अक्षय्य तृतीयेला गाडी किंवा आणखी काही खरेदी करूच नका. इतकंच नव्हे तर या अक्षय्य तृतीयेला कोणतंही शुभकार्य करू नका.
पण तुम्ही या अक्षय्य तृतीयेला सोनं, गाडी किंवा इतर मोठं काही खरेदी न करता इतर काही गोष्टी खरेदी करू शकता त्या कोणत्या ते पाहुयात.
advertisement
सोनं नाही तर काय खरेदी करायचं?
गोमती चक्र
पिवळ्या कवड्या
पिवळ्या मोहरीचे दाणे (नंतर दान करा)
तांबे किंवा पितळेची भांडी
श्री यंत्र
धणे
कापूस
मातीची घागर
ज्योतिषी इशा यांनी हा व्हिडीओ Astro_Vastu_With_Ishaa या आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
Location :
Delhi
First Published :
May 10, 2024 7:47 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Akshaya Tritiya 2024 : थांबा! अक्षय्य तृतीया म्हणून चुकूनही सोनं खरेदी करू नका; तज्ज्ञांनी सांगितलं कारण